इन्स्टाची रील अशी कुठंही बसून करतात होय? पोलिसांनी खाक्या दाखवलाच, तुम्हीही सावध रहा बरं का !

पोलीस ठाण्यातच इन्स्टाग्राम रील बनवणे एका बांधकाम विकासकाला चागंलेच महागात पडले आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी विकासकावर तडीपारची कारवाई केली आहे.

इन्स्टाची रील अशी कुठंही बसून करतात होय? पोलिसांनी खाक्या दाखवलाच, तुम्हीही सावध रहा बरं का !
पोलीस ठाण्यात इन्स्टाग्राम रील बनवणाऱ्या बिल्डरवर तडीपारची कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 2:25 PM

डोंबिवली / सुनील जाधव : पोलिसांच्या खुर्चीवर बसून इन्स्टाग्राम आणि फेसबुकसाठी रील बनवणे एका बिल्डरला महागात पडले आहे. मानपाडा पोलिसांनी विकासकावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर न्यायालयातून जामिनावर सुटका झाल्यानंतर आता झोन 3 पोलिसांनी त्याच्यावर तडीपार करण्याची कारवाई केली असून, आज त्याला नोटीस बजावत जिल्ह्याबाहेर पाठवले आहे. सुरेंद्र पाटील असे या विकासकाचे नाव असून, त्याच्यावर 7 गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई केल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.

आरोपी हा डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक

सध्या स्वतःचे रिल बनवून व्हायरल करण्याचे फॅड जोरात सुरू आहेत. त्यासाठी लोक काहीही करत असतात. अशीच एक रील बनविण्यासाठी एक महाशय चक्क पोलीस ठाण्यात दाखल झाले. हे महाशय डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक असून, सुरेंद्र पाटील असे त्यांचे नाव आहे. पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील बनविल्याने खळबळ उडाली होती.

पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये केली होती रील

एका गुन्हा संदर्भात सुरेंद्र हा दिवाळीत मानपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. तेव्हा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कोणी नव्हते. याचा फायदा घेत पाटील याने खुर्चीवर बसून स्वतःची रिल बनवली. पोलीस ठाण्यातील रील व्हायरल होताच मानपाडा पोलीसांनी त्याची गंभीर दखल घेत त्याला अटक केली होती. मात्र त्याची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून तडीपारची कारवाई

यानंतर आता झोन 3 पोलिसांनी त्याच्यावर तडीपार करण्याची कारवाई केली असून आज त्याला पोलिसांनी नोटीस बजावत जिल्हा बाहेर पाठवले आहे सुरेंद्र पाटील असे त्यांचे या विकासकाचे नाव असून त्याच्या 7 गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई केल्याची माहिती डोंबिवली ACP सुनील कुराडे यांही दिली आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.