Dawood Ibrahim : अनेक राजकारणी आणि उद्योजक दाऊदच्या हिटलिस्टवर, मुंबई-दिल्लीसह बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट

दाऊद इब्राहिमने भारताला घाबरवण्यासाठी एक विशेष युनिट तयार केली आहे. एनआयएने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये याचा खुलासा झाला आहे. नुकतेच, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध (FIR) नोंदवले होते. याच एफआयआरवर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे.

Dawood Ibrahim : अनेक राजकारणी आणि उद्योजक दाऊदच्या हिटलिस्टवर, मुंबई-दिल्लीसह बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट
अनेक राजकारणी आणि उद्योजक दाऊदच्या हिटलिस्टवर, मुंबई-दिल्लीसह बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 5:30 PM

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आता पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबई दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट रचत आहे. तसेच अनेक राजकारणी (Politicians) आणि प्रतिष्ठित लोक दाऊदच्या हिटलिस्टवर असल्याचे कळते. दाऊद इब्राहिमने भारताला घाबरवण्यासाठी एक विशेष युनिट तयार केली आहे. एनआयएने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये याचा खुलासा झाला आहे. नुकतेच, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदवले होते. याच एफआयआरवर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. (many politicians and businessman on dawood’s hit list plot to carry out massacres in big cities including mumbai-delhi)

भारताचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात आश्रयाला आहे. भारतात दहशत निर्माण करण्यासाठी दाऊदने एक विशेष युनिट तयार केले असून भारतातील प्रतिष्ठीत लोक, राजकीय नेते, प्रसिद्ध उद्योजक या युनिटच्या निशाण्यावर आहेत. एफआयआरनुसार दाऊद इब्राहिमचे हे विशेष युनिट शस्त्रे, स्फोटके आणि प्राणघातक शस्त्रांद्वारे हल्ल्याची योजना आखत आहे.

भारतातील विविध शहरांमध्ये दंगल घडवण्याचा कट

भारतातील मोठ्या शहरांमध्ये दंगली उसळतील अशा घटना घडवून आणण्याचीही दाऊदची योजना आहे. मुंबई आणि दिल्लीसह अनेक मोठी शहरे दाऊदच्या या स्पेशल युनिटच्या निशाण्यावर आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय एजन्सीसह उत्तर प्रदेशातून 2 पाकिस्तानी ट्रेंडसह अनेकांना अटक केली होती. यावेळी आयएसआय आणि अंडरवर्ल्डच्या नवीन दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला होता. अटक केलेल्या आरोपींना दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने हवालाद्वारे पैसे पाठवले होते आणि बॉम्बस्फोटासाठी आयईडी देखील पुरवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उघड केले होते.

दाऊदकडून बिटकॉईनचा वापर

गुन्हेगारी घटनांमध्ये दाऊद टोळीकडून बिटकॉईनचा वापर करण्यात येत आहे. कारण बिटकॉईनचा माग काढता येत नसल्याने गुन्ह्यांमध्ये वापरण्यात येणारे हे महत्वाचे चलन आहे. दाऊदही बिटकॉईनशी खेळत असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) देखील मिळाली आहे. त्यामुळे ईडीही त्याच्या तपासात सहभागी आहे. या वॉलेट्सचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जातो. दाऊद यूएईमध्ये वॉलेटच्या माध्यमातून मोठे ट्रान्जेक्शन करीत असून रिअल इस्टेटमध्ये मालमत्ता खरेदी करत आहे. (many politicians and businessman on dawood’s hit list plot to carry out massacres in big cities including mumbai-delhi)

इतर बातम्या

Kalyan : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

एका दिवसासाठी पत्नी बाहेर गेलेली, परत आल्यावर अज्ञात मुलीची अवस्था पाहून हादरली, पती फरार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.