मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आता पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबई दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट रचत आहे. तसेच अनेक राजकारणी (Politicians) आणि प्रतिष्ठित लोक दाऊदच्या हिटलिस्टवर असल्याचे कळते. दाऊद इब्राहिमने भारताला घाबरवण्यासाठी एक विशेष युनिट तयार केली आहे. एनआयएने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये याचा खुलासा झाला आहे. नुकतेच, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदवले होते. याच एफआयआरवर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. (many politicians and businessman on dawood’s hit list plot to carry out massacres in big cities including mumbai-delhi)
भारताचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात आश्रयाला आहे. भारतात दहशत निर्माण करण्यासाठी दाऊदने एक विशेष युनिट तयार केले असून भारतातील प्रतिष्ठीत लोक, राजकीय नेते, प्रसिद्ध उद्योजक या युनिटच्या निशाण्यावर आहेत. एफआयआरनुसार दाऊद इब्राहिमचे हे विशेष युनिट शस्त्रे, स्फोटके आणि प्राणघातक शस्त्रांद्वारे हल्ल्याची योजना आखत आहे.
भारतातील मोठ्या शहरांमध्ये दंगली उसळतील अशा घटना घडवून आणण्याचीही दाऊदची योजना आहे. मुंबई आणि दिल्लीसह अनेक मोठी शहरे दाऊदच्या या स्पेशल युनिटच्या निशाण्यावर आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय एजन्सीसह उत्तर प्रदेशातून 2 पाकिस्तानी ट्रेंडसह अनेकांना अटक केली होती. यावेळी आयएसआय आणि अंडरवर्ल्डच्या नवीन दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला होता. अटक केलेल्या आरोपींना दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने हवालाद्वारे पैसे पाठवले होते आणि बॉम्बस्फोटासाठी आयईडी देखील पुरवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उघड केले होते.
गुन्हेगारी घटनांमध्ये दाऊद टोळीकडून बिटकॉईनचा वापर करण्यात येत आहे. कारण बिटकॉईनचा माग काढता येत नसल्याने गुन्ह्यांमध्ये वापरण्यात येणारे हे महत्वाचे चलन आहे. दाऊदही बिटकॉईनशी खेळत असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) देखील मिळाली आहे. त्यामुळे ईडीही त्याच्या तपासात सहभागी आहे. या वॉलेट्सचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जातो. दाऊद यूएईमध्ये वॉलेटच्या माध्यमातून मोठे ट्रान्जेक्शन करीत असून रिअल इस्टेटमध्ये मालमत्ता खरेदी करत आहे. (many politicians and businessman on dawood’s hit list plot to carry out massacres in big cities including mumbai-delhi)
इतर बातम्या
एका दिवसासाठी पत्नी बाहेर गेलेली, परत आल्यावर अज्ञात मुलीची अवस्था पाहून हादरली, पती फरार