Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लग्नाच्या जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात जुळतात!’ मुंबई उच्च न्यायालयानं असं नेमकं का म्हटलं?

Mumbai High Court : लग्नानंतर मॉरिशसलाही घेऊन गेलो. तिला एक महागडा मोबाईल फोन खरेदी करुन दिला. आपलं व्हॉट्सअप चॅटिंग दाखवत पतीनंही पत्नीवर आरोप करत ती आपल्याला कसा त्रास देते, याबाबत युक्तिवाद केला होता.

'लग्नाच्या जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात जुळतात!' मुंबई उच्च न्यायालयानं असं नेमकं का म्हटलं?
मुंबई उच्च न्यायालयानं केलेल्या टिप्पणीनं चर्चांना उधाण!
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 10:31 PM

मुंबई : लग्नाच्या जोड्या स्वर्गात जुळतात, अशी एक सर्वसाधारण म्हण आहे. पण मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) एका प्रकरणात सुनावणी करताना जोडी स्वर्गात (Heaven) नाही, तर नरकात बनते, असं म्हटलं आहे. एका कौटुंबिक वादाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी उच्च न्यायालयानं आपला निकाल देताना ही टिप्पणी केली आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या पिठानं याप्रकरणी सुनावणी करताना केलेली ही टिप्पणी चर्चेत आली आहे. एका पतीनं मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. क्रूरतेनं मारहाण आणि हुंडा मागण्याचा आरोप एका पत्नीनं आपल्या पतीवर केला होता. यानंतर हे दाम्पत्य (Couple Fights) एकत्र राहण्यास तयार नव्हतं. याप्रकरणी पतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं लग्नाच्या जोड्या या सर्वागत नाही, तर नरकात बनतात, असं म्हटलंय.

आजतकनं दिलेल्या वृत्तनुसार, कोर्टात पती आणि पत्नीनं एकमेकांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. सारंग कोतवाल यांनी या प्रकरणी सुनावणी देताना आदेशात म्हटलंय की, याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन तक्रारदार पती-पत्नीला एकत्र राहायचं नसल्याचं दिसून आलंय. त्यांच्या वारंवार भांडणं होत असल्याचंही दिसून आलं आहे. तेव्हा या प्रकरणी सुनावणी करताना संतापलेले न्यायधीश कोतवाल यांनी जोड्या स्वर्गात नव्हे तर नरकात बनतात, असं म्हटलंय.

कधीचं प्रकरण?

डिसेंबर 2021मध्ये एका महिलेनं आपल्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला होता. महिलेनं आपल्या पतीवर आरोप करताना म्हटलं होतं की 2017 मध्ये त्यांचं लग्न झालं. त्यावेळी लग्नात पतीच्या कुटुंबातील प्रत्येकाला सोन्याचं एक नाणं हवं, अशी मागणी करण्यात आली होती. पण आरोप करण्यात आलेल्या महिलेला ही गोष्ट करणं शक्य न झाल्यानं सासरी तिचा छळ सुरु झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. पीडित महिलेनं फ्लॅट घेण्यासाठी 13 लाख 50 हजार रुपयेही दिले होते. या दाम्पत्याला एक तीव वर्षांचा मुलगा देखील आहे. या महिलेनं आपल्या पतीवर आरोप करत त्यानं आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलंय. सोबतच मारहाणीत पीडित महिलेच्या पाठीवर जखमा झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

पतीचा काय दावा?

दुसरीकडे पतीनंहा आपल्या पत्नीवर आरोप केले आहे. आपण घर घेण्यासाठी 90 हजार रुपयांचं कर्ज काढलं. इतकंच काय तर लग्नानंतर मॉरिशसलाही घेऊन गेलो. तिला एक महागडा मोबाईल फोन खरेदी करुन दिला. आपलं व्हॉट्सअप चॅटिंग दाखवत पतीनंही पत्नीवर आरोप करत ती आपल्याला कसा त्रास देते, याबाबत युक्तिवाद केला होता. यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या.

याप्रकरणी सुनावणी देताना पतीला दिलासा देताना त्याला अंतरीम जामीन कोर्टानं दिला आहे. शिवाय त्याची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्याचीही कोणतीही गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. एकूण नवरा-बायकोच्या या भांडणात कोर्टानं केलेली लग्नाच्या जोड्यांबाबतची टिप्पणी चांगलीच चर्चेत आली आहे.

संबंधित बातम्या :

हैवानतेचा कळस! नराधम बापासह भावाचाही बलात्कार! आईची डोळेझाक, कल्याणमधील हादरवणारी घटना

आधी गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावले अन… ;

पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ

पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...