हुंड्याची हाव थांबेना… 21 लाख देऊनही मागणी सुरूच, वधूने लग्न मोडून पोलिसांत घेतली धाव
एका कुटुंबाने 12 लाख रुपये हुंडा देण्याच्या अटीवर लग्न ठरवले. मात्र नंतर त्यांची मागणी वाढली. 21 लाख रुपये देऊनही त्यांची मागणी कमी न झाल्याने पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. तर वरासह चार आरोपी फरार आहेत.
रांची : झारखंडमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने हुंडा (dowry) म्हणून 12 लाख रुपये देण्याच्या अटीवर मुलीशी लग्न ठरवले. मात्र ही रक्कम घेऊनही त्यांची हुंड्याची भूक शमली नाही. लग्नास नकार (will call off marriage) देण्याची धमकी देत ते आणखी पैसे उकळत राहिले. 21 लाख रुपये देऊनही नवऱ्यामुलाच्या कुटुंबियांची हुंड्याची मागणी कमी न झाल्याने पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्र दोघांना अटक केली असून, वरासह चार आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
खरंतर कोतवाली परिसरात एक कुटुंब राहते. या कुटुंबातील मुलीसाठी झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील सुभाष नगर गोमो पोलीस स्टेशन हरिहरपूर येथे राहणारे काही लोकं लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते. त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांकडे हुंडा म्हणून 12 लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या संमतीने कुटुंबीयांनी त्यांचा मुलगा विकास सिंग याचे मुलीशी लग्न निश्चित केले. ठरल्यानुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनी हुंड्याची रक्कम मुलाच्या घरच्यांना दिली. मात्र ही रक्कम मिळाल्यानंतरही त्यांची हुंड्याची मागणी कमी झाली नाही. ठरलेलं लग्न मोडण्याची धमकी देत त्यांना हुंड्यासाठी आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुलीच्या कुटुंबीयांनी कशीबशी त्यांची मागणी पूर्ण केली. हुंड्याची रक्कम 21 लाखांवर पोहोचली असतानाही मुलाच्या कुटुंबाने रकमेची आणखी मागणी करत लग्न मोडले. यामुळे संतापलेल्या मुलीच्या भावाने पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यादरम्यान हुंडा घेणाऱ्यांचे चेहरे उघड झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक यू उदयकिरण यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेवरून एएसपी अभिषेक वर्मा आणि सीएसपी विश्व दीपक त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिटी कोतवाल रुपक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथक झारखंडला पाठवण्यात आले.
पोलीस पथकाने कथित वराचा विकास सिंगचे वडील अशोक कुमार आणि त्याचा भाऊ राकेश सिंग यांना बऱ्याच प्रयत्नांनंतर अटक केली. त्याला झारखंड येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर कोरबा येथे आणण्यात आले. जिथे हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 420, 384, 34 आणि 5 नुसार कारवाई करत दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र या प्रकरणात नवरामुलगा विकास सिंह, सुभाष सिंह, सावित्री प्रसाद आणि अयोध्या सिंह फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.