काय माणसं आहेत! फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून महिलेला बेदम चोपलं, नवऱ्यासह तिघांवर गुन्हा

रंगीबेरंगी बांगड्या घालायला बहुतांश महिलांना आवडतात. भरपूर बांगड्या घातलेले हातही उठून दिसतात. पण याच बांगड्यांवरून कोणी तुमच्या जीवावर उठलं तर ? फक्त नव्या फॅशनच्या बांगड्या घातल्या, म्हणून कोणी तुम्हाला मारहाण केली तर ? ऐकायलाही नकोसं वाटतं ना, पण असं खरंच घडलं आहे.

काय माणसं आहेत! फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून महिलेला बेदम चोपलं, नवऱ्यासह तिघांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 1:29 PM

नवी मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मेरे हातों में नौ-नौ चुडिया है…! जुनं झालं असलं तरी हे गाणं बहुतांश लोकांच्या आवडीचं असावं. काचेच्या, लाखेच्या, सोन्याच्या , हिऱ्याच्या ते अगदी साध्या, रंगीबेरंगी बांगड्या घालायला बहुतांश महिलांना आवडतात. भरपूर बांगड्या घातलेले हातही उठून दिसतात. पण याच बांगड्यांवरून कोणी तुमच्या जीवावर उठलं तर ? फक्त नव्या फॅशनच्या बांगड्या घातल्या, म्हणून कोणी तुम्हाला मारहाण केली तर ? ऐकायलाही नकोसं वाटतं ना, पण असं खरंच घडलं आहे.

केवळ नव्या, फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून एका महिलेला तिच्या सासरच्यांनी आणि नवऱ्यानेही अक्षरश: गुरासारखं बदडलं. तेही मुंबईसारख्या शहरातं. हो , हे अगदी खरं आहे. नवी मुंबईतील दिघा येथे ही अतिशय भयानक आणि अंगावर कापरं आणेल अशी घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी नवरा आणि सासरचे लोक, अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

23 वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीनुसार, पीडितेचा पती प्रदीप अरकडे (30) हा फॅशनेबल बांगड्या घालण्याच्या विरोधात होता आणि या मुद्द्यावरून त्याने पीडितेशी वाद घातला.

नातेवाईकांनीही मध्ये पडून केली मारहाण

13 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. त्या दिवशी पीडित महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या 50 वर्षीय सासूने तिचे केस धरून ओढलं आणि तिला अनेकवेळा थोबाडीतही मारली. तिचा पतीही या मारहाणीत सामील होता, त्याने पीडितेला बेल्टने अमानुषपणे मारहाण केली. हे सगळं घडत असताना तिचे सासरचे इतर नातेवाईकही उपस्थित होते. मात्र मध्ये पडून हा प्रकार थांबवण्याऐवजी, त्यांच्यापैकी एका महिलेनेही पीडित महिलेला मारहाण केली.तिला जोरात जमीनीवरही ढकललं, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

माहेर गाठून, पीडितेने पोलिसांत नोंदवली तक्रार

या सर्व प्रकारामुळे हादरलेल्या पीडित महिलेने तत्काळ पुण्याला, तिच्या आई-वडिलांकडे धाव घेतली. आणि तेथे जाऊन नवरा आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी नवी मुंबई येथे ट्रान्स्फर करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पीडितेचा नवरा आणि तिच्या सासरच्या लोकांविरोधात भारतीय दंड संहिता (Indian Penal Code IPC)) कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 324 (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करणे), 34 (सामान्य हेतूने), 504 (उत्तरभंगास चिथावणी देण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतता) आणि 506 (गुन्हेगारी धमकी),या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.