‘ती’ कारने सासरी गेली, पण व्हीलचेअरवर परतली; एका मागणीसाठी पतीने केले भयानक कृत्य..

| Updated on: Aug 02, 2023 | 10:07 AM

वडिलांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याचं थाटामाटात लग्न लावून दिलं. पण त्यांच्या लाडक्या लेकीला सासरच्यांच्या वागण्यामुळे बराच त्रास सहन करावा लागला. तोही एका शुल्लक मागणीसाठी..

ती कारने सासरी गेली, पण व्हीलचेअरवर परतली; एका मागणीसाठी पतीने केले भयानक कृत्य..
उसने पैसे दिले नाही म्हणून महिलेला मारहाण
Follow us on

लखनऊ | 2 ऑगस्ट 2023 : देशात हुंड्यामुळे (dowry) दिल्या जाणाऱ्या त्रासाची प्रकरणे कमी होताना दिसतच नाहीत. हुंड्यासाठी कधी विवाहीतेची हत्या , तर कधी मारहाण, कधी तिला घरातूनच बाहेर काढल्याच्या घटना वारंवार कानावर पडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना (crime) प्रतापगडच्या सांगीपूर येथे घडली आहे. तेथे राहणाऱ्या एका तरूणीला हुंड्यापायी आयुष्यभराची शिक्षा मिळाली आहे.

तिच्या सासरच्या लोकांनी तिला छतावरून खाली फेकून दिले. पीडितेचा नवरा बुलेट मागत होता, मात्र मुलीच्या माहेरचे ती मागणी पूर्ण करू शकले नाहीत. या रागातूनच त्याने पत्नीला छतावरून फेकून दिल्यान ती अपंग झाली.

भूसू मुरैनू गावात राहणारे महेश सिंह यांच्या मुलीचं, आशिमाचं लग्न 21 नोव्हेंबर 2021 मध्ये बबुरी गावातील सुरजीतशी झालं होतं. महेश यांनी त्यांना जमेल तसे पैसे-हुंडा धेऊन मोठ्या दक्यात मुलीचं लग्न लावून तिची पाठवणी केली होती.

दररोज करायचे मारहाण

आशिमाच्या विवाहीत जीवनाला सुरूवात होते न होते तोच तिच्या सासरच्या लोकांनी कमी हुंडा मिळाल्याची तक्रार करत तिला त्रास देण्यास सुरूवात केली. ते तिला दररोज मारहाणही करायचे. पोलिसांना दिलेल्या पत्रात पीडित आशिमाने एक लाख रुपये आणि एक बाईक हुंडा म्हणून दिल्याचे नमूद केले होते, मात्र नंतर सासरच्यांनी एक लाख रुपये आणि बुलेट बाईकची मागणी करण्यास सुरुवात केली.

आशिमाने याबाबत तिच्या वडिलांनाही सांगितले, मात्र त्यांनी आणखी हुंडा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यांनी तिच्या सासरच्या लोकांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला, पण ते पैसे आणि बुलटेच्या मागणीवर अडून राहिले. ते आशिमाला रोज त्रास द्यायचे, तिचा छळ करायचे. घटनेच्या दिवशी आशिमाला जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.

गच्चीवरून फेकले खाली

सासरच्यांनी आशिमाला किचनमध्ये नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पती सुरजीत, दीर बादल, सासू शीला आणि नणंद रेखा यांचा समावेश होता. मात्र आशिमाने कसाबसा तिचा जीव वाचवला आणइ ती पळत गच्चीवर गेली. पण तिथे वाचण्याचा काहीच मार्ग नव्हता. त्याचवेळी तिचा पती सुरजित गच्चीवर पोहोचला आणि त्याने तिला ग्चीवरून थेट खाली फेकून दिले, ज्यामुळे ती अपंग झाली,

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या पालकांनी तिला सासरच्या घरातून माहेरी आणले आहे.