तरुणाने प्रेमविवाह केला होता… पण ”या” कारणामुळे थेट जीवनच संपवलं

समर्थनगर येथे राहणाऱ्या सुनीता नागरे यांनी याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाने प्रेमविवाह केला होता... पण ''या कारणामुळे थेट जीवनच संपवलं
बंगळुरुमध्ये कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 7:18 PM

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) आडगाव पोलीस ( City Police ) ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमविवाह केलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्याचे कारण म्हणजे सासरच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. एकूणच या घटनेमुळे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडाली असून आत्महत्येची चर्चा होत आहे. विवाहित तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची नोंद आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये पत्नीच्या आई आणि तिच्या नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले असून पत्नीसह नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा नोंद केला आहे. योगेश नगारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

समर्थनगर येथे राहणाऱ्या सुनीता नागरे यांनी याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत पूजा तितलकुमार छेत्री, सविता छेत्री, पूजाचा बाॅयफ्रेंड (नाव नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा

या संशयितांनी संगनमत करत योगेशला मानसिक त्रास देत पैशांची मागणी करत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

याशिवाय योगेश याला मानसिक त्रास दिला जात असे, त्याची पत्नी देखील पैशांसाठी तगादा लावत असल्याने योगेशने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या टाकळी परिसरातील या घटनेवरून पोलिसांचा तपास सुरू असून चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.

अशा घटना नवीन नसल्या तरी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आत्महत्येच्या घटनेची जोरदार चर्चा होत असून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.