Pandharpur Accident : पंढरपूरमध्ये मारुती कार आणि ट्रकचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पंढरपूर-सांगोला रोडवर गेल्या दोन वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा महामार्ग बनला आहे. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

Pandharpur Accident : पंढरपूरमध्ये मारुती कार आणि ट्रकचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
पंढरपूरमध्ये मारुती कार आणि ट्रकचा अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:09 PM

पंढरपूर : भरधाव ट्रकने मारुती स्विफ्ट कारला जोरदार धडक (Hit) दिल्याने कारमधील दोघांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. पंढरपूर सांगोला रस्त्यावर मठ वस्तीजवळ हा अपघात (Accident) घडला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाला. सुशांत सुभाष केदार (22) आणि शनिदेव प्रकाश केदार (20) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सांगोला तालुक्यातील वासूद येथील रहिवासी आहेत. तरुणांच्या मृत्यूमुळे केदार कुटुंबासह वासूद गावावर शोककळा पसरली आहे.

मयत सुशांत आणि शनिदेव हे तरुण आपल्या मारुती स्विफ्ट कारने पंढरपूरकडून सांगोल्याला चालले होते. यावेळी पंढरपूर ते खर्डी दरम्यान मठ वस्तीजवळ कार येताच सांगोल्याकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात कारचा चक्काचूर झाला. याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पंढरपूर-सांगोला मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

पंढरपूर-सांगोला रोडवर गेल्या दोन वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा महामार्ग बनला आहे. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केल्यापासून वाहन चालकही बेपर्वाईने वाहने चालवतात. यामुळे अपघात होत असतात.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबईतील पामबीच रोडवर भीषण अपघातात दुचाकीस्वराचा मृत्यू

नवी मुंबईतील पामबीच रोडवर कारावे गावाजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज विश्वकर्मा (22) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी ह्युंडाई वेरना कार चालकाला ताब्यात घेतले आहे. मयत तरुण आपल्या दुचाकीवरुन बेलापूरकडून वाशीकडे चालला होता. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या ह्युंडाई वेरना कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. (Maruti car and truck accident in Pandharpur, two died on the spot)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.