Accident | माथेरानमध्ये विचित्र अपघात, चालकाचा ताबा सुटला, एर्टीगा कार पलटी

सुदैवाने पर्यटकांना फारशी इजा नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं. पोलीस आणि ग्रामस्थांकडून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत

Accident | माथेरानमध्ये विचित्र अपघात, चालकाचा ताबा सुटला, एर्टीगा कार पलटी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:16 PM

निनाद करमरकर, रायगडः रायगड (Raigad) जिल्ह्यातील माथेरान (Matheran) या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा आज विचित्र अपघात झाला. घाटातून कार चालवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने एर्टीगा कार रस्त्यावरून बाजूला झाली आणि थेट पलटी (Car Accident) झाली. सुदैवाने या कारमधील पर्यटकांना फार गंभीर इजा झाली नाही. मात्र कारचा हा विचित्र अपघात रस्त्यावरील सर्वांनाच धडकी भरवणारा ठरला.

Matheran प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनिमित्त माथेरानला फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. यापैकीच एका पर्यटकाच्या गाडीला आज भीषण अपघात झाला. माथेरानच्या घाटात विचित्र अवस्थेत ही एर्टीगा कार कोसळली. या कारमध्ये मुंबईहून आलेले दोन पर्यटक होते.

Matheran

सुदैवाने पर्यटकांना फारशी इजा नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं. पोलीस आणि ग्रामस्थांकडून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

Matheran

सोलापुरात अपघात, 4 जणांचा मृत्यू

तर अन्य एका घटनेत तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघातात दुर्वैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच सोलापूरमधून ९ जण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. बुधवारी दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना कारने डिव्हायरला धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.