Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांसोबत मोबाईल गेम खेळला, मग रुमवर जाण्यासाठी निघाला अन्…

मयत विद्यार्थी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील रहिवासी आहे. कोटा येथे तो मेडिकलची तयारी करत होता आणि हॉस्टेलला राहत होता.

मित्रांसोबत मोबाईल गेम खेळला, मग रुमवर जाण्यासाठी निघाला अन्...
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याने जीवन संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 10:07 PM

कोटा : राजस्थानमधील कोटा येथे एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मयत विद्यार्थी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील रहिवासी आहे. कोटा येथे तो मेडिकलची तयारी करत होता आणि हॉस्टेलला राहत होता. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.

सहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडला

हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावर मित्रांसोबत शुक्रवारी रात्री तो मोबाईलवर गेम खेळत होता. यानंतर 11.30 वाजण्याच्या दरम्यान तो रुमवर झोपायला जायला निघाला. याच दरम्यान चप्पल घालत असताना त्याचा तोल गेला अन् तो खाली कोसळला.

आधी अॅम्बुलन्सची मग उपचारांची वानवा

यात गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र आधी रुग्णालयात न्यायला अॅम्बुलन्स वेळेत मिळाली नाही, मग रुग्णालयात त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू

रुग्णालयातील डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी उपकरणे नसल्याचे सांगितले. यामुळे जखमी विद्यार्थ्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. विद्यार्थ्याला दुसऱ्या रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशात विसाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये विसाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नमन मदान असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे. नोएडातील सेक्टर 168 मध्ये गोल्डन पार्क सोसायटीत ही घटना घडली.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....