चोरी करून ते SORRY लिहून ठेवायचे, भुयार खणून सोन्याची दुकाने लुटायचे

चोरांना पकडण्यासाठी शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. मोबाईल संभाषण तपासले गेले, गुप्त माहिती आधारे अखेर त्यांना अटक करण्यात आली.

चोरी करून ते SORRY लिहून ठेवायचे, भुयार खणून सोन्याची दुकाने लुटायचे
meerutImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 8:25 PM

लखनऊ : मेरठ शहरातील अनेक सराफांची सोने-चांदीची दुकाने फोडण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या होत्या. त्यापैकी चोरीच्या चार प्रकरणात चोरट्यांनी गेट तोडला नव्हता, शटर तोडले नव्हते किंवा भिंत ओलांडून प्रवेश केला नव्हता. तर या चोरट्यांनी चक्क भूयार खणून या चोऱ्यांना केल्या होत्या. आणि चोरी केल्यानंतर दुकानदाराला वाईट वाटू नये म्हणून ही चोर मंडळी सॉरी अशी सूचना मागे लिहून पळून जायचे. अशा चोरांपैकी तिघा जणांना अटक करण्यात यश आले आहे.

चोरांच्या एका गॅंगने मेरठ पोलिसांची झोप उडविली होती. ही गॅंग चोरी करायची तेही भुयार खणून, त्यामुळे मेरठ पोलिसांची नोकरीच धोक्यात आली होती. मेरठ पोलिसांनी या चोरांपैकी तिघांना अटक केली आहे. ही चोर मंडळी रात्री चोरी करुन दिवसा मजूरी करायचे. भुयार खणण्याची कला आपण युट्युबवर व्हिडीओ पाहून शिकल्याचे त्यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे.

मेरठमध्ये अनेक महिन्यांपासून चोरांनी उच्छाद मांडला होता. भुयारे खणून या चोऱ्या केल्या जात होत्या. 27 मार्च रोजी नौचंदी ठाणा क्षेत्रातील अंबिका ज्वेलर्समध्ये नाल्यावाटे चोरटे शिरले आणि त्यांनी दुकाने लुटले होते. त्यात 15 लाखाचा माल आणि सीसीटीव्ही-डीव्हीआर पळविला होता. चोरांनी SORRY अशी लेखी सूचना लिहून ठेवली होती. या घटनेनंतर मेरठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर नौचंदी पोलिसांची बदल्या झाल्या होत्या. आणि एक वेगळे तपास पथक नेमले.

भाड्याने घर घेतले होते

चोरांना पकडण्यासाठी शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. मोबाईल संभाषण तपासले गेले, गुप्त माहिती आधारे बुलंदशहर येथून यामीन, शबीर आणि अमित या चोरट्यांना पकडण्यात यश आले. मेरठच्या एसएसपी रोहीत सिंह यांनी सांगितले की चोरट्यांनी मेरठच्या लिसाडी गेट येथे भाड्याने घर घेतले होते. रात्री चोरी करायचे आणि दिवसा ते मजूरी करायचे. जेथे जास्त सीसीटीव्ही नाहीत अशी दुकाने हेरून भुयार खणायचे. त्यांच्याकडून चांदी आणि दोन लाखाची रोकड सापडली आहे. तीन गुन्ह्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

दोन रात्रीत भुयार खणायचे

या चोरट्यांकडे गॅस कटर पासून सर्व सामान होते. त्यांना एक भुयार खणायला दोन ते अडीच दिवस लागायचे. ज्या दिवशी दुकान बंद असेल त्या दिवशी त्या दिवशी ते लुटायचे. चोरी केल्यावर जास्त वाईट वाटू नये म्हणून ते सॉरी असे लिहून ठेवायचे असे चोरट्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.