विरारमध्ये चाललंय काय ? गाडीला कट मारला म्हणून तरूणावर जीवेघणा हल्ला

मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना अगदी ताजी असतानाच आता विरारमध्ये पुन्हा एक भयानक प्रकार घडला आहे. विरार शहरात एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. विरार पूर्वेतील विठ्ठलवाडी सरकारनगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली.

विरारमध्ये चाललंय काय ? गाडीला कट मारला म्हणून तरूणावर जीवेघणा हल्ला
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 8:20 AM

मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर रेल्वे स्टेशनवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना अगदी ताजी असतानाच आता विरारमध्ये पुन्हा एक भयानक प्रकार घडला आहे. विरार शहरात एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. विरार पूर्वेतील विठ्ठलवाडी सरकारनगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला. आरोपींनी लोखंडी रॉडने तरूणावर हल्ला केला, त्याला मारहाण केली आणि ते फरार झाले.

या हल्ल्याची संपूर्ण घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यामध्ये संबंधित तरूणी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या पाच जणांविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

नवऱ्याने सकाळी 7.30 वाजता पत्नीला विरारच्या रेल्वे ब्रिजवर गाठलं आणि…

काही दिवसांपूर्वीच विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. विरार रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गळ्यावर, हातावर चाकूने वार करून, ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली. विरार फलाट क्रमांक एकच्या ब्रिजवर सकाळी कामावर जाताना 7:30 वाजता ही घटना घडली. घरातील कौटुंबिक वादातून हा हल्ला केला अशी माहिती समोर आली आहे. शिवा शर्मा असे आरोपीचे नाव वीरशिला शर्मा असे जखमी पत्नीचे नाव आहे.

विरारमध्ये आरती यादव प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती दिसून आली. काही दिवसांपूर्वी वसईत भररस्त्यात अशाच प्रकारने एका तरूणाने भरदिवसा, भररस्त्यात, सर्वांसमोर त्याच्या प्रेयसीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून तिची हत्या केली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.