Hyderabad: चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, प्राइवेट पार्टवर मिरची पावडर टाकली
चोर असल्याच्या संशयावरुन तरुणाला पाईपने मारहाण
मुंबई : हैदराबादमधील (Hyderabad) हबीबनगर पोलिस स्टेशनमध्ये (Habeeb Nagar Police Station) एक तक्रार दाखल झाली आहे. तक्रार ऐकल्यानंतर पोलिस चक्रावून गेले आहेत, कारण एका अल्पवयीन तरुणाला चोरी केल्याच्या आरोपावरुन पाईपने मारहाण केली आहे. विशेष म्हणजे मारहाण करण्यापुर्वी त्याच्या प्राइवेट पार्टमध्ये मिरची पावडर (chilli powder) टाकली असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिस आता मारहाण करणाऱ्या व्यक्तीवरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुलाच्या आईने शेजारच्या दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये दुकानदार व्यक्ती अफजल सागर याने मुलाला मारहाण केली आहे. त्याचबरोबर मिरची पावडर टाकल्याचं म्हटलं आहे अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
नेमकं काय झालं
मुलाला दुकानदाराने इमारतीच्या गच्चीवर नेले, तिथं गेल्यानंतर त्या मुलाचे हात-पाय नायलॉनच्या रश्शीने बांधले. त्यानंतर त्यांच्या प्राइवेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली. त्यानंतर मुलगा एकदम तडफडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तसेच पुन्हा अशी चोरी केलीस बघ अशी सुद्धा धमकी दिली आहे.
जर मुलाने चोरी केली आहे, तर त्यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखवावं असं मुलाच्या काकांनी पोलिसांना सांगितलं. तसेच मुलाच्या आईने मुलावरती चुकीचा आरोप लावल्याचं म्हटलं आहे.