Mumbai Crime : १४ वर्षांच्या मुलाने SUV चालवायला घेतली अन् नको ते घडलं….

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे. वाट्टेल तशा गाड्या चालवणाऱ्या लोकांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या व्हिडीओमुळे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Mumbai Crime : १४ वर्षांच्या मुलाने SUV चालवायला घेतली अन् नको ते घडलं....
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 2:38 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : रस्त्यावर चालताना गर्दीमुळे किंवा वाहनांच्या वेगामुळे अपघात झाल्याच्या अनेक केसेस समोर आल्या असतील. पण पादचाऱ्यांनी काळजी घेऊनही कारचालकांच्या निष्काळजी वृत्तीमुळे आणि बेपर्वाईमुळे एखादी व्यक्ती जखमी झाली तर काय ? हिट अँड रनच्या (hit and run) अनेक केसेस आत्तापर्यंत समोर आल्या असून तसाच आणखी एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील चांदिवली येथे एसयूव्ही कारची (car accident) धडक बसून एक ज्येष्ठ नागरिक जखमी (senior citizen injured) झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या आलिशान गाडीचा चालवणारा चालक, हा अवघ्या १४ वर्षांचा मुलगा होता.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, एकच खळबळ माजली असून एवढ्या लहान मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकांबद्दलही संताप व्यक्त होत आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. त्या व्हिडीओनुसार, सकाळच्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक कॉलनीच्या गेटमधून चालत बाहेर आले व रस्त्याच्या कडेने चालत होते. तेवढ्यात त्याच बिल्डींगच्या गेटमधून एक एसयूव्ही (कार) बाहेर आली. डावीकडे वळतानाच एसयूव्हीची, बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला धडक बसली. मात्र ऑटोला जोरदार धडक दिल्यानंतर त्या कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या वृद्ध व्यक्तीलाही धडक दिल्याचे व्हिडीओत दिसून आले.

ऑटो आणि वृद्ध माणसाला धडकल्यानंतर एसयूव्ही कार चालवणाऱ्या त्या मुलाने आपली एसयूव्ही भरधाव वेगाने पुढे नेली आणि तो तेथून फरार झाला. गेटमधून बाहेर येतानाच त्या मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहेत. ताबा सुटल्याने त्याने आधी ऑटोला व त्यामागोमाग वृद्ध नागरिकालाच धडक दिली.

वृद्ध नागरिक गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, कारची जोरदार धडक बसल्याने पीडित वृद्ध नागरिक खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या मदतीसाठी तत्काळ धाव घेतली आणि त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन महिने संपूर्ण बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या मुलाच्या पालकांवर कारवाई केली आहे. त्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून तो भरल्यानंतर मुलाची सुटका करण्यात आल्याचे समजते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.