Virar Rape : मैत्रिणीच्या मदतीने विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपी अटक, एक फरार

मैत्रिणीने तिला फिरायला जायचे सांगून विरारमधील एका झोडपट्टीतील खोलीत नेले. तिथे गेल्यानंतर तरुणीने आपल्या दोन मित्रांना बोलावले. या दोघांनी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.

Virar Rape : मैत्रिणीच्या मदतीने विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपी अटक, एक फरार
मैत्रिणीच्या मदतीने विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 6:47 PM

विरार : मैत्रिणीच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची संतापजनक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. फिरायला जाण्याच्या बहाण्याने आरोपी तरुणी पीडित मुलीला सोबत घेऊन गेली. त्यानंतर आपल्या दोन मित्रांना बोलावून घेतले. या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी विरार पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Arrest) केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

विरार पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पीडित मुलगी 21 वर्षाच्या मैत्रिणीसोबत मंगळवारी 16 ऑगस्ट रोजी फिरायला गेली होती. मैत्रिणीने तिला फिरायला जायचे सांगून विरारमधील एका झोडपट्टीतील खोलीत नेले. तिथे गेल्यानंतर तरुणीने आपल्या दोन मित्रांना बोलावले. या दोघांनी अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलीने घरी गेल्यानंतर याबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने तिला घेऊन विरार पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन विरार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेची मैत्रिण आणि दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. तर या गुन्ह्यात साथ देणारा आरोपींचा आणखी एक साथीदार फरार झाला आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया

घटना अतिशय निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. आता शासनाने कठोर पावले उचलून असा गुन्हेगारांना तातडीने शिक्षा करण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया माँ सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा गीता आयर यांनी दिली आहे. तर अशा वासनांध आरोपींना नपुंसक केले पाहिजे तरच गुन्हेगारांवर वचक बसेल, असे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा गीता जाधव यांनी म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिला, मुली दिवसेंदिवस असुरक्षित होत आहेत. अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, या घटना वाढल्या आहेत. या घटनांवर आळा घालायचा असेल तर वासनांधाना कठोर शासन झाले पाहिजे, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव आम्रपाली साळवे म्हणाल्या. (Minor girl abused in Virar with help of friend, Three accused arrested)

हे सुद्धा वाचा

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....