रायगड : शिरुर तालुक्यात 32 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना ताजी असतानाच आता पेण तालुक्यातील वाशी परिसरात अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. या मुलीला सतत धमकी देत आरोपी आळीपाळीने बलात्कार करायचे. या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून आतापर्यंत 7 नराधमांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणातील आणखी 3 जण फरार झाल्याची माहिती पीआय बाळा कुंभार यांनी दिलीय. मागील अनेक दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार अशा घटनांनी महाराष्ट्राची प्रतिमा काळवंडली आहे. असे असताना आता वाशी परिसरातील या बलात्कारच्या (Gang Rape) घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वाशी परिसरात एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसोबत राहायची. मात्र या मुलीला मागील अनेक दिवसांपासून काही तरुण या ना त्या कारणावरुन सतत धमकवायचे. तसेच मागील अनेक दिवसांपासून हे तरुण मुलीला धकमी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. मात्र हा प्रकार अखेर समोर आला आहे. बालात्कारीची ही घटना माहीत होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरु केली. पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील आणखी 3 आरोपी फरार आहेत. तशी माहिती पीआय बाळा कुंभार यांनी असून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, शिरुर तालुक्यात अशाच प्रकारे सामूहिक बलात्काराची घटना घडली. येथे 32 वर्षीय विधवा महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पीडित महिला भोळसट असून ही घटना 23 जानेवारी रोजी उघडकीस आली होती. या महिलेच्या नवऱ्याचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे होते. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा, भोळसट स्वभावाचा फायदा आरोपींनी उचलला. महिलेवर 1 एप्रिल 2021 ते 31मे 2021 या दरम्यान सतत सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारातून पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर संबंधित घटनेचा उलगडा झाला.
इतर बातम्या :
Borivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या
वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा