मासिक पाळीचा भयंकर त्रास, इतक्या वेदना की तिने आयुष्यच संपवलं; मुंबईसारख्या बड्या शहरातील धक्कादायक घटना

मासिक पाळीचा त्रास प्रत्येक मुलीला, महिलेला सहन करावा लागतो. काहींना जास्त त्रास होतो तर काहींना कमी. पण थोड्याफार प्रमाणात सर्वच स्त्रियांना यातून जावं लागतं. त्यावर विविध उपायही केले जातात. मात्र मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्यच संपवल्याची धक्कादायक घटना घडली

मासिक पाळीचा भयंकर त्रास, इतक्या वेदना की तिने आयुष्यच संपवलं; मुंबईसारख्या बड्या शहरातील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 12:10 PM

मासिक पाळीचा त्रास प्रत्येक मुलीला, महिलेला सहन करावा लागतो. काहींना जास्त त्रास होतो तर काहींना कमी. पण थोड्याफार प्रमाणात सर्वच स्त्रियांना यातून जावं लागतं. त्यावर विविध उपायही केले जातात. मात्र मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्यच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाड परिसरात मंगळवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणीच नसताना तिने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. ती अवघ्या 14 वर्षाची होती. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी 14 वर्षांची होती, ती मालवणी येथील खारोडी परिसरात तिच्या आई-वडिलांसह रहात होती. तिला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. मात्र त्या दरम्यान होणारा त्रास तिला सहन होत नव्हता. त्यामुळेच मानसिक नैराश्यातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी संध्याकाळी तिने तिच्या राहत्या घरातील लोखंडी सळीला गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवून टाकलं. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.

हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला. वेळ न घालवता त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बेशुद्ध मुलीला त्यांनी कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास तिला मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मालवणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तिच्या पालकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास होत होता ,त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचललल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.