रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीला गोड बोलून बसवलं, अन्… अंबरनाथमधील धक्कादायक घटना
महिला आणि तरूणींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोेणत्या भागातून अत्याचाराची घटना समोर येत आहेत. अशातच अंबरनाथ येथून एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रातील महिला आणि तरूणींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अनेक अशाच प्रकारच्या घटना समोर येत आहे. आई-बहिणींवर हात टाकणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही. अशातच अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना घडली आहे. आरोपी रिक्षाचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ येथे राहणारी पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी जात होती. तिला आरोपी रिक्षा चालकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं. त्यानंतर त्याने मुलीला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला. याबाबत घाबरलेल्या पीडितेने आपल्या पोलिलांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर रिक्षा चालकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षा चालकालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. मात्र अत्याचाराच्या या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, महिला आणि तरूणींवर हात टाकणाऱ्या नराधमांना ना कायद्याचा ना व्यवस्थेचा कोणाचीही धाक राहिलेला नाही. घटना घडत आहेत आरोपींना अटक होतेय ते जामीन किंवा पुराव्यांअभावी बाहेर येत आहेत. याच्या पलीकडे काहीच वेगळे चालत नाहीय. एखादी महिला किंवा तरूणी भिडली पण नंतर काय? भविष्यात तिच्या जीवाला कायम त्या नराधमाकडून धोका असणार याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे गंभीर प्रकरणातील एखाद्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिल्यावर इतर दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही.