भर दिवाळीत आईशी भांडून घराबाहेर पडली अन्.. मुंबईतील अल्पवयीन मुलीवर पाँडिचेरीत सामूहिक अत्याचार
नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आई-वडिलांसह मुंबईहून पॉँडिचेरीला गेलेल्या एका 16 वर्षांच्या मुलीसाठी ही ट्रीप अतिशय भयानक ठरली.
नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आई-वडिलांसह मुंबईहून पॉँडिचेरीला गेलेल्या एका 16 वर्षांच्या मुलीसाठी ही ट्रीप अतिशय भयानक ठरली. त्या अल्पवयीन मुलीवर एका रिक्षाचालकाने अत्याचार केला. मात्र तिच्यी दुर्दैवी कथा तेवढ्यावरच नाही, त्यानंतर तिला चेन्नईला नेण्यात आले आणि तेथेही तिला दोन दिवस डांबून ठेवून सहा पर्यटकांनी तिच्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केल्याची अतिशय क्रूर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली असून सोमवारी पोलिसांनी विल्लुपुरम जिल्ह्यातील कोटाकुप्पम येथील ऑटो चालक काजा मोहिद्दीनला अटक केली. तसेच तीन पर्यटकांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते तिघेही चेन्नईतीलच रहिवासी आहेत. याप्रकरणी इतर नराधम आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.
आईशी भांडून घराबाहेर पडली अन् होत्याचं नव्हतं झालं…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 16 वर्षांची असून ती मुंबईची रहिवासी आहे. दिवाळीसाठी ती आई-वडिलांसोबत पाँडिचेरीला नातेवाईकांकडे आली होती. 30 ऑक्टोबरच्या रात्री 9 च्या सुमारास, तिचं आईशी भांडण झालं आणि ती नातेवाईकांच्या घरातून बाहेर पडली अन् आरोपी मोहिद्दीनच्या रिक्षात बसली. शहरातील काही पर्यटनस्थळांकडे रिक्षा वळव असं तिने रिक्षाचालकाला सांगितलं, पण त्याने त्याची ऑटो कोटाकुप्पम येथे नेली, त्या मुलीला दारू पाजली आणि तिच्यावर शारीरिर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्या मुलीला ऑरोव्हिले येथे सोडले.
पर्यटकांनी मैत्रीचा हात पुढे करत दिला धोका
पीडित मुलगी तेथील बीचवर फिरत असताना काही पर्यटक तरूणांनी तिला पाहिले. तिने चेन्नईला मैत्रिणीकडे जायची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी तातडीने तिला लिफ्टही दिली. मात्र त्यानंतर तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्या तरूणांनी तिला ऑफीसद्वारे देण्यात आलेल्या खोलीवर नेलं, तेथेही तिला दारू पाजली आणि आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अखेर 2 नोव्हेंबर रोजी त्या नराधम आरोपींनी तिला कॅबमध्ये बसवून पाँडिचेरी येथील बीच रोड येथे सोडून दिले. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर बराच काळ परत आली नाही, त्यामुळे चिंताग्रस्त आईने पोलिसांत धाव घेत मुलगी हरवल्याची तक्राही नोंदवली होती. त्याच वर्णनाशी मिळती जुळती एक मुलगी बीच रोडवर असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि त्यांनी लागलीच तेथे धाव घेतली असता पीडित मुलगी तेथेच त्यांना सापडली.
ती अतिशय अशक्त , कृश झाली होती, काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, अखेर तिला JIPMER येथे दाखल करण्यात आले. थोडं बरं वाटू लागल्यानंतर बालकल्याण समितीच्या पथकाने तिची विचारपूस केली असता संपूर्ण घटनेचा उलगडा झाला, असेही पोलिसांनी नमूद केलं.
रिक्षाचालक मोहिद्दीनने तिला त्याच्या घरी नेण्यापूर्वी एका गेस्ट हाऊसमध्ये तिच्यावर अत्याचर केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं. याप्रकरणी पोलिसांनी मोहिद्दीन आणि इतर आरोपींविरोधात पॉस्को ( Pocso) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोहिद्दीनला केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत इतर काही आरोपींचीही ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एकाला आंध्र प्रदेशमधून तर इतर दोघांन ओदिशातून अटक करण्यात आली. तर इतर तीन आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे.