ठाणे : माणुसकीला काळिंमा फासणारी घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे (Minor Girl Raped And Tortured). एका सावत्र बापाने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधम बापाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहे.सध्या अल्पवयीन चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली (Minor Girl Raped And Tortured).
माणुसकीला आणि दातृत्वाला काळिमा फासणारे कृत्य मुंब्रा येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंब्र्यातील रशिद कंपाऊंड येथील भाड्याच्या घरात 44 वर्षीय नराधम आपली पत्नी आणि सहा वर्षीय सावत्र मुलीसोबत रहात होता. मुलीची आई बाहेर जाताच नराधम सावत्र बाप पीडित मुलीला अमानुष मारहाण करुन तिच्या सर्वांगावर माचीस आणि मेणबत्तीचे चटके देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करायचा.
पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही. परंतु, या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली आणि घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने चिमुकलीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता, याचा पाढाच वाचला. कसा आपला नराधम सावत्र पिता माचीसचे चटके देत होता आणि आपल्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता याची माहिती दिली.
पीडित मुलीची कथा ऐकून परिसरातील महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित मुलीची तपासणी करुन तिच्यावरील अत्याचाराची खात्री पटताच मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन कौसा पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक केली. त्याच्यावर भादंवी कलम 376, 323, 506 (2), बाल न्याय अधिनियम कलम 75, पोस्को 4, 6, 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे या प्रकरणी तपास करत आहेत.
टिटवाळ्यात 22 वर्षीय विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, नराधमांना तासाभरात अटकhttps://t.co/7RfanaNs3J#Titwala #GangRape #KalyanPolice #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020
Minor Girl Raped And Tortured
संबंधित बातम्या :
प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं
प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या
चोरीची घटना लपवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाची हत्या, नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार