अनाथाश्रम चालकाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी फरार

अनाथ आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. (minor girl rape nanded orphanage)

अनाथाश्रम चालकाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी फरार
हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे.
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 10:47 AM

नांदेड : अनाथ आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुदखेडच्या अनाथ आश्रम चालकानेच हा अत्याचार केल्याची माहिती आहे. या आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल असून तो सध्या फरार आहे. पोलीस आरोपी शिवाजी गुटठे याचा शोध घेत आहेत. (minor girl raped in nanded mudkhed orphanage)

मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमधील मुदखेड येथे एक अनाथाश्रम आहे. या अनाथाश्रमात अनेक मुली आहेत. आश्रमाचा संस्थाचालक शिवाजी गुटठे याने तक्रारदार मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसा आरोप तक्रारदार मुलीने केला आहे. तक्रारदार मुलीने आरोपीच्या अत्याचारांना  कंटाळून अखेर आपल्या एका मैत्रीणीसोबत अनाथाश्रमातून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीने मुदखेडहून रेल्वेप्रवास करत थेट किनवट शहर गाठले. यानंतर अनाथाश्रमामधून मुली गायब असल्यामुळे खळबळ उडाली.

पोलिसांना संशय आणि प्रकार समोर आला

मुली अनाथाश्रमातून गायब झाल्यानंतर त्या किनवट येथे भटकत होत्या. या दोन मुलींच्या हावभावावरुन त्या अडचणीत असल्याचे किनवटच्या पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी या मुलींची चौकशी केल्यानंतर मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. अनाथाश्रमाचा चालकच यातील एका मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे या मुलींनी सांगितले.

आरोपी फरार

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या मुलींची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी शिवाजी गुटठे याला शोधण्याची मोहीमही सुरु केली आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

इतर बातम्या :

दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त

घरातील कटकटींचा वैताग, आधी लोखंडी रॉडने पत्नीचा खून; नंतर मुलीचाही गळा दाबला

विवाहबाह्य प्रेम संबंध उघड होण्याच्या भीतीने तरुणाचा निर्घृण खून, नांदेडमध्ये विवाहित महिलेसह प्रियकराला अटक

(minor girl raped in nanded mudkhed orphanage)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.