अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मैत्रिणीनेच दिला धोका

अकोला शहरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर तिघांना सामूहिक अत्याचार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीचाही या गुन्ह्यात सहभाग असून तिनेच तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं आणि तिला बेशुद्ध केलं.

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मैत्रिणीनेच दिला धोका
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचा
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 12:32 PM

अकोला शहरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर तिघांना सामूहिक अत्याचार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीचाही या गुन्ह्यात सहभाग असून तिनेच तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं आणि तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिघा तरूणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी तीन तरुणांसह पीडित मुलीच्या मैत्रीणीवर गुन्हा दाखल केला आहे. टी सटवाले, लल्ला इंगळे आणि आणखी एका अज्ञात आरोपीचा यात समावेश आहे. तर पीडित तरूणीच्या मैत्रिणीविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पायल असे तिचे नाव असल्याचे समजते. मात्र अत्याचार करणारे तिघेही आरोपी फरार असून पोलिसांनी फक्त पाल हिला अटकेली असून न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय झालं ?

पीडित मुलगी ही अल्पवयीन ( वय 15) असून ती मूळची जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिक्षणासाठी ती अकोला येथे तिच्या चुलत मावशीकडे रहात होती. तेथे ती एका शाळेत 10वीत शिकत असून तेथए एक मुलगी तिची मैत्रीण बनली. त्यानंतर त्या पीडितेची तिचा मित्र बंटी याच्याशी ओळख करून दिली. तसेच चुलत मामीचीही भेट करुन दिली होती. पीडित मुलीचा वाढदिवस असल्याने चुलत मामीचा पती लल्ला इंगळेने तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी रात्री 12 वाजता नेले. तेथून पीडितेचा मित्र बंटी सटवाले आणि त्याची मैत्रीण पायल हे दुसऱ्या मामीच्या घरी गेले.

तेथे लल्ला इंगळे व बंटी यांनी दारू प्यायली. त्यांनी पीडितेलाही जबरदस्तीने बिअर पाजली आणि सॉफ्टड्रिंक मध्ये गुंगीचा औषध घालून तिला बेशुद्ध केलं. त्यानतंर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्यानी तिचा अश्ली व्हिडीओही बनवला आणि तिला ब्लॅकमेल करत राहिले. या प्रकरणात जुने शहर पोलीस स्टेशन येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यात पायल ही पोलिसांच्या अटकेत आहे. मात्र इतर तिघे फरार असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.