लपंडाव खेळताना घात झाला, नराधमाने अल्पवयीन मुलीला घरात कोंडून…

बदलापूरच्या घटनेवनरून राज्यात तीव्र पडसाद उमटत असतानाच रोज अत्याचाराची काही ना काही प्रकरणे उघडकीस येत आहेत. मुलींवरील अत्याचार वाढतच चालले आहेत. त्यातच आता जळगावमध्येही असंच एक भयानक कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे.

लपंडाव खेळताना घात झाला, नराधमाने अल्पवयीन मुलीला घरात कोंडून...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 10:45 AM

राज्यात महिला काय लहान मुली तरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्या मुली असोत किंवा मुंबईतील पित्याने अत्याचार केलेली 9 वर्षांची मुलगी नाहीतर क्लासमध्ये शिकण्यास गेलेली अल्पवयीन मुलगी… या सगळ्या जणी अत्याचाराला बळी पडल्या आहेत. बदलापूरच्या घटनेवनरून राज्यात तीव्र पडसाद उमटत असतानाच रोज अत्याचाराची काही ना काही प्रकरणे उघडकीस येत आहेत. मुलींवरील अत्याचार वाढतच चालले आहेत. त्यातच आता जळगावमध्येही असंच एक भयानक कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे. तेथे एका 40 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सिद्धार्थ वानखेडे असे त्या नराधम आरोपीचे नाव असून गुन्ह घडल्यानंतर त्याने लागलीच मुंबईला पलायन केलं होतं. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत त्या नराधमला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज जळगाव जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

लंपडाव खेळताना घरात शिरली अन् घात झाला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 11 वर्षांची असून ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत लपंडाव खेळत होती. खेळता खेळता लपायला ती अचानक नराधम इसमाच्या घरात शिरली. तीच संधी साधून आरोपीने घराचा मुख्य दरवाजा लावला, घरातले सगळे दिवे बंद केले आणि त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तिने प्रतिकार करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचं तोंड दाबलं. शांत राहिली नाहीस तर तुला जीवानिशी मारेन अशी धमकीही त्याने तिला दिली.

या अत्याचारामुळे पीडित मुलीला मोठा धक्का बसला. काही दिवसांनी तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि तिच्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. हे सगळं ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकरली, पण त्यांनी या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार कथन करून त्यांनी आरोपी वानखेडे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

मात्र गुन्हा घडल्यानंतर संशयत आरोपी हा मुंबईला पळून गेला होता.. अखेर पोलिसांनी अथक तपास करून त्याला मुंबईतून अटक केली. या संशयित आरोपीला आज जळगाव जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.