Mira road Murder : मनोज साने याच्याशी सरस्वती वैद्य हीचे या कारणाने नेहमी भांडण व्हायचे, विसरभोळा असलेल्या साने याने पॉर्नसाईटची नावे…

मीरारोड हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वती वैद्य हीचे मनोज साने याच्याशी भांडण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून त्याने सरस्वती हीची हत्यातर केली नाही ना याचा शोध पोलीस घेत आहेत.

Mira road Murder : मनोज साने याच्याशी सरस्वती वैद्य हीचे या कारणाने नेहमी भांडण व्हायचे, विसरभोळा असलेल्या साने याने पॉर्नसाईटची नावे...
सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर बहिणी करणार अंत्यसंस्कारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 12:33 PM

Mira road Murder : मीरारोड रहीवासी 56 वर्षीय मनोज साने ( Manoj Sane ) याने आपल्या पार्टनर सरस्वती ( वय 32 ) हीचा निर्घृन खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, त्यांना नष्ट करण्यासाठी ते कुकरमध्ये शिजवण्यासारख्या श्रद्धा वालकर हत्याकांडालाही लाजवेल असे कृत्य केले. त्यामुळे हे ( Mira road Murder Case ) हत्याकांड कौर्याची सारी सीमा ओलांडणाऱ्या मनोज साने याने पोलीसांना सरस्वतीचा खून केल्याची कबूली देत नसल्याने त्याला फासी होण्यासाठी पोलीसांना आता परिस्थितीजन्य पुरावे जमा करावे लागणार आहेत. साने याला विसरण्याची सवय असल्याने त्याने एका कागदावर पॉर्न साईटची नावे लिहून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून त्याचे सरस्वती ( Saraswati Vaidya )  हिच्याशी भांडण झाल्याचा दावा केला जात आहे.

मीरारोड हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वती वैद्य हीचे मनोज साने याच्याशी भांडण झाल्याचे उघडकीस आले आहे. सरस्वती वैद्य हीला मनोज साने खूश ठेवू शकत नव्हता, कारण त्याला पॉर्नसाईट पाहण्याची सवय लागली होती. तो सतत पॉर्नसाईट पाहत बसायचा. त्याला विसरण्याची सवय असल्याने त्याने एका कागदावर तब्बल 78 पॉर्नसाईटची नावे लिहीली होती. तसेच साने इतर महिलांकडे वाईट नजरेने पहायचा यावरूनही सरस्वती हीचे त्याच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते अशी माहीती उघडकीस आली आहे.

पॉर्नसाईट साईट पहाण्याबरोबरच त्याने गुगलवर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायच्या यासाठी सर्चिंग केले होते. त्याची सर्च हिस्टरी पोलीसांना तपासासाठी मदतीला येणार आहे. गुन्ह्यासाठी त्याने नेमकी कोणती पद्धत वापरलेली की त्याने सरस्वतीला गळा दाबून ठार केले हे स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वुड कटर आणिल ग्रॅंनाईट लादी कटर हे साहित्य त्याने जेथून विकत घेतले ते दुकानही सापडले आहे. त्याने मुतदेहाचे तुकडे केले पण धडापैकी पाय सापडले आहेत. तेच नष्ट करायचे राहीले असतानाच शेजारच्यांनी दुगर्धींची तक्रार केल्याने त्याला अटक झाली.

श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आधार

सरस्वतीचा खून ज्या दिवशी झाला असा संशय असलेल्या 4 जून रोजीची आरोपीची ब्राऊझिंग हिस्टरी पोलीसांनी तपासली असता साने बॉडी कुजू नये तिचा वास येऊ नये यासाठी काय करावे असे प्रश्न गुगलला साईटवर विचारल्याचे पोलीसांना आढळले. त्याने श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हत्याकांडाचा आधार या प्रकारासाठी घेऊन बॉडी नष्ट करण्यासाठी वूड कटर आणि लादी कटर आणले होते. त्याचा वापर करून त्याने कूकरमध्ये अवयव शिजवले, नंतर मिक्सरमध्ये ते बारीक करून नष्ट केल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.