कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये सुरु झालेल्या केडीएमसीच्या जंबो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वोर्डबॉयचा शोध सुरू केला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने हा प्रकार उघडकीस आला (Molestation of a women in KDMC Jumbo COVID Centre Kalyan).
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याआधी कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. काही महिन्यांपूर्वी कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीत जंबो कोविड सेंटर तयार करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर तयार होऊन पडून होते. आत्ता कोरोना रुग्ण वाढत असल्याने हे सेंटर दोन दिवसापूर्वी सुरु करण्यात आले आहे.
प्रसुती झालेली महिला कोरोना संसर्गामुळे उपचारासाठी सेंटरमध्ये दाखल
दोन दिवसांपूर्वी प्रसूती झालेली एक महिला कोविड पॉझिटीव्ह झाल्याने या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाली. या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने विनयभंग केला. महिलेने हा सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला फोनवर कळवला. सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांच्या पुढाकाराने हे प्रकरण बाजारपेठ पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.
वॉर्डबॉय खासगी असल्याची पोलिसांची माहिती
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यशवंत चव्हाण यांनी सांगितलं, “या घटनेसंदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी श्रीकांत मोहिते याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल. हा वॉर्डबॉय खासगी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. परंतु आम्ही तपास करणार आहोत. आरोपी श्रीकांत मोहिते याचा शोध सुरु आहे.”
महिला वॉर्डात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती का नाही?
या बाबत सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत म्हणाले, “हा प्रकार कोविड सेंटरमध्ये घडला आहे. हा दुदैवी प्रकार आहे. महिला वॉर्डात महिला कर्मचारी नियुक्त केले गेले पाहिजे. पोलिसांनी विनयभंग करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. आरोपी श्रीकांत हा दोन दिसवांपूर्वीच कामाला लागला होता.”
हेही वाचा :
कल्याणमधील ख्यातनाम माजी नगरसेवकावर अपहरणाचा आरोप, वाचा प्रकरण नेमकं काय?
व्हिडीओ पाहा :