Uttar Pradesh Crime: मुझफ्फरनगरात 900 कोटींचे ड्रग्ज जप्त, भारतात फ्लिपकाद्वारे येत होते, कोट्यवधींचे अंमली पदार्थ
गुजरात एटीएसकडून हैदरच्या मुझफ्फरनगरातील त्याच्या घराजवळील शेजारच्या घरात छापा टाकून 150 किलो हेरॉईन ताब्यात घेण्यात आले आहे.
नवी दिल्लीःएटीएसने (ATS) शाहीन बागेतून (Shaheen Bagh) पकडलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी हैदरच्या मुझफ्फरनगरच्या अड्ड्यावरुन 150 किलो पेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी गुजरात एटीएसला (Gujrat ATS) मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत 900 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत एनसीबीकडून हैदरला शाहीन बागेतील त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीते 50 किलो हेरॉईन व 30 लाख रुपये रोख 300 कोटी रुपयांचे 47 किलो इतर मादक पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
गुजरात एटीएसकडून हैदरच्या मुझफ्फरनगरातील त्याच्या घराजवळील शेजारच्या घरात छापा टाकून 150 किलो हेरॉईन ताब्यात घेण्यात आले आहे.
ड्रग्ज कनेक्शन आंतरराष्ट्रीय
एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात आम्ही हवाला व्यावसायिक शमीमला लक्ष्मी नगर येथून अटक केली आहे. तो दुबईत शाहिदला ड्रग मनी पाठवत होता. या सिंडिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या सिंडिकेटच्या तारा दुबई, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणशी जोडलेल्या आहेत.
हद्दीवर जाऊन चौकशी करणार
याप्रकरणी एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटारी आणि गुजरातमध्ये जे काही हेरॉईन जप्त केले गेले आहे, ते हेरॉईन एकाच माणसाकडून घेण्यात येत होते. त्यामुळे एनसीबीच्या टीमने अटारी आणि गुजरातीमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी करणार असल्याचे सांगितले.
फ्लिपकार्टचा उपयोग
दिल्लीतील शाहीन बाग परिसरातूनही 50 किलोचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते, हेरॉईन आणि 30 लाखांची रोख रक्कम, त्याचबरोबर पैसे मोजण्याचे यंत्र आणि कित्येक किलो ड्रग्जही ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या हेरॉईनची किंमत किमान 300 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जात आहे. हे ड्रग्ज अफगाणिस्तानातून फ्लिपकार्टच्या पकिंगधून आली होती, त्यामुळे या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास सुरु असून या ड्रग्ज प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले गेले आहे.
फिशिंगच्या नावाखाली बोटीतून ड्रग्ज
अलीकडेच, गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळून सुमारे 280 कोटी रुपयांचे 56 किलो ड्रग्ज ताब्यात घेतल गेले आहे. या कारवाईत 9 पाकिस्तानी मच्छिमारांनाही अटक करण्यात आली आहे, जे फिशिंगच्या नावाखाली बोटीतून ड्रग्जचा पुरवठा करत होते. या प्रकरणाची चौकशी केली असता हे अंमली पदाऱ्थ पाकिस्तानातून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.