बलात्कार, विनयभंग आणि… महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची यादी वाचून घाम फुटेल; कल्याण-डोंबिवलीत चाललंय काय?
क्रूर गुन्ह्यांच्या या घटनांमुळे कल्याण-डोंबिवली परिसर सध्या प्रचंड गाजत असून त्यामुळे नागरिकही दहशतीत जगत आहेत. हे कमी की काय म्हणून आता या दोन शहरांतील गेल्या वर्षभरातील गुन्ह्यांची भलीमोठ्ठी यादीच समोर आली असून जवळपास 3 हजारपेक्षा जास्त गुन्हे झाल्याचे उघड झाले
अमराठी कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला झालेली मारहाण असो किंवा फूस लावून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यार अत्याचर करून केलेली हत्या असो… क्रूर गुन्ह्यांच्या या घटनांमुळे कल्याण-डोंबिवली परिसर सध्या प्रचंड गाजत असून त्यामुळे नागरिकही दहशतीत जगत आहेत. हे कमी की काय म्हणून आता या दोन शहरांतील गेल्या वर्षभरातील गुन्ह्यांची भलीमोठ्ठी यादीच समोर आली असून जवळपास 3 हजारपेक्षा जास्त गुन्हे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये बलात्कार, विनयभंग, चोरी, अपहर, घरफोड्या, खून अशा एकाहून एक निर्घृण गुन्ह्यांचा समावेश आहे. वर्षभरात कल्याण-डोंबिवली हद्दीत 3044 विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले, अशी माहिती डीसीपी झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस बळ कमी असले तरी 78% गुन्ह्याची उकल पोलिसांनी केल्याचेही त्यांनी नमूद केलं.
वर्षभरात कोणकोणते गुन्हे ? पोलिसांनी थेट आकडेवारीच मांडली…
गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली हद्दीत 3044 विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले असून यातील 78% म्हणजेच 2373 गुन्ह्यांची उकल झाली आहे, अशी माहिती डीसीपी झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील महिलांवर बलात्कार, विनयभंगाचे , अपहरण, अशा एकूण 514 गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच 21 खून , 32 खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे , 198 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
गुन्ह्यांची तपशीलवार आकडेवारी :
महिलांवरील गुन्हे : 18 वर्षाखालील मुलींवरील बलात्काराचे 65 गुन्हे दाखल; सर्व 100% उघडकीस.
18 वर्षावरील महिलांवरील बलात्काराचे 58 गुन्हे; सर्व उघडकीस आले.
विनयभंगाचे 235 गुन्हे, त्यापैकी 226 उघडकीस.
अपहरणाचे 156 गुन्हे, त्यापैकी 145 उघडकीस आले आहेत.
इतर गंभीर गुन्हे :
खूनाचे 21, खूनाच्या प्रयत्नाचे 32 गुन्हे; 100% उघडकीस.
घरफोडीचे 198 गुन्हे, त्यापैकी 123 उघडकीस.
दारूबंदीचे 487 गुन्हे; सर्व उघडकीस आले.
महत्त्वाची कारवाई कोणती ?
22.45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. तसेच अंमली पदार्थ प्रकरणांत 51.05 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
19 अग्नीशस्त्रे आणि 133 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून 1 कोटी 51 लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून तो नागरिकांना परत करण्यात येणार आहे.
पोलिसांची बांधिलकी :
पोलिसांचे मनुष्यबळ कमी असूनही, पोलीस मित्र आणि दक्ष नागरिकांच्या मदतीने सुरक्षा पुरवण्यात आली, असे डीसीपी झेंडे यांनी सांगितले. संघटित गुन्हेगारीविरोधातही प्रभावी कारवाई करण्यात आली असून हद्दपारीचे 79 प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. एकूणच, कल्याण-डोंबिवली पोलीसांनी गुन्ह्यांच्या उकल आणि सुरक्षिततेच्या बाबतीत प्रभावी कामगिरी बजावल्याचे डीसीपी झेंडे यांनी नमूद केलं.