पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराची धडपड, पोलिसांवर जीवघेणा हल्लाही केला, पण अखेर…

| Updated on: Jun 24, 2023 | 10:17 AM

चैन स्नॅचिंग प्रकरणी वाँटेड आरोपी पकडायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला केला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी थरारनाट्य रंगले.

पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराची धडपड, पोलिसांवर जीवघेणा हल्लाही केला, पण अखेर...
कल्याणमध्ये मोस्ट वाँटेड आरोपी अटक
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : कल्याण अंबिवली इराणी पाड्यातील 50 हून अधिक चैन स्नॅचिंगचे दाखल असलेल्या मोस्ट वाँटेड आरोपीला खडकपाडा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अलिहसन आबू इराणी असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने आपल्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचल्याचे कळताच आरोपीने पळ काढण्याचा प्रत्न केला. घरातील खिडकीतून पळ काढत जंगलातील चिखलाच्या दलदलीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरु केला. यावेळी पोलिसांचे तोंड चिखलात खूपसून त्याने निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करत असलेल्या इतर पोलिसांनी चिखलात धाव घेत, या आरोपीच्या चिखलातच मुसक्या आवळल्या आहे.

मीरा -भाईंदरमधील चैन स्नॅचिंगमध्ये वाँटेड आरोपी

मुंबईजवळ असलेल्या मीरा भाईंदर परिसरात गेल्या आठ दिवसात सहा ते सात ठिकाणी चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनेचा एक सीसीटीव्ही मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिटच्या हाती लागला. या सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी अलिहसन आबू इराणी हा कल्याणमधील आंबिवली परिसरात राहणारा असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना मिळाली.

मीरा रोड आणि कल्याण पोलिसांची संयुक्त कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड भाईंदर युनिटचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी कल्याणजी घेटे आणि कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्याकडे आरोपीची माहिती दिली. यानंतर कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यातील एपीआय गायकवाड, जितेंद्र ठोके, अशोक पवार, योगेश भुतकर, राजू लोखंडे, संदीप भोईर, शिंदे अशा 7 जणांची एक टीम बनवली. मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिटसोबत कल्याण आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घराबाहेर सापळा रचून त्याला पकडले. पुढील तपासासाठी आरोपीला मीरा भाईंदर पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे सुद्धा वाचा