नशेसाठी तो बनला हैवान, आधी आई आणि भावाची हत्या केली, मग…

नशेसाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठिण. अशीच एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

नशेसाठी तो बनला हैवान, आधी आई आणि भावाची हत्या केली, मग...
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मुलीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 11:52 AM

पटियाला : आजकालची तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. नशेसाठी ते काहीही गुन्हा करायला तयार होतात. मग अगदी रक्ताच्या नात्यांचाही त्यांना विसर पडतो. अशी एक घटना पंजाबमधील पटियालामध्ये उघडकीस आली आहे. नशेसाठी एका तरुणाने दोन साथीदारांसोबत मिळून आई आणि भावाची हत्या केल्याची घटना पटियाला क्षेत्रातील कांगथला गावात घडली आहे. हत्येनंतर मृतदेहांचे तुकडे केले. मग आईच्या मृतदेहाचे तुकडे जाळले, तर भावाच्या मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकले. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या दोघा साथीदारांना अटक केली आहे. गुरविंदर सिंह असे मुख्य आरोपीचे नाव असून, तो फरार आहे.

आईला नशा करण्यास मनाई करायचा

गुरविंदरला नशा करण्याचे व्यसन होते. यासाठी तो वारंवार आईकडे पैसे मागायचा. मात्र, आई त्याला नशा करण्यापासून रोखायची तसेच पैसेही द्यायची नाही. लहान भाऊही त्याला नशेपासून रोखायचा. याच कारणातून त्याने दोघांचा काटा काढला. त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून आई आणि सावत्र भावाची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे केस काढले. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला.

घरात धूर पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले

हत्येनंतर आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन आरोपीने घरातच रॉकेल टाकून जाळले. मात्र जाळत असताना घरातून धूर निघत होता आणि खूप विचित्र वास येत होता. यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहिले तर मृतदेहाचे तुकडे जळत होते. सर्व प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करत त्यांची चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीच्या भावाचा मृतदेह नाल्यातून ताब्यात घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.