नाशिक – महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील काही जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र कायम सुरूचं आहे. वारंवार आत्महत्या होत असल्याचं चित्र आहे. नाशिक (Nashik) जिल्हा देखील त्यामध्ये मोडतो. नाशिकमध्ये देखील रोज तीन ते चार आत्महत्या होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. देवळाली कॅम्पमध्ये दोघा मायलेकींनी रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली आहे. देवळाली (Devlhali) कॅम्पमध्येमध्ये ही घटना घडल्यापासून घबराहटीचे वातावरण पसरले आहे. अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे अशी मायलेकीची नावे आहेत. देवळाली कॅम्पमध्ये शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहेत. अनिता शिरोळे यांचे पती रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार आहेत. ते कामानिमित्त सोलापूरला गेले आहेत. मायलेकी दोघीचं घरात होत्या. दोघींनी अचानक मुंबई-नाशिकरोडकडे असलेला रेल्वेमार्ग गाठला आणि गीतांजली एक्सप्रेस खाली आत्महत्या केली.
मायलेकीनी आत्महत्या का केली याबाबत कोणतंही ठोस कारण पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराम मायलेकीनी गीतांजली एक्सप्रेस पुढे आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. शिरोळे कुटुंबियातील आत्महत्या केलेली राखी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तसेच त्यांची मोठी मुलगी विवाहीत आहे. अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे या दोघीचं घरी होत्या. दोघींना असं का पाऊलं उचललं यामुळे पोलिस चक्रावून गेले आहेत. या प्रकणाचा तपास उपनिरीक्षण पवार करीत आहेत.
एक कामगार तिथून निघाला होता. त्यावेळी त्याला तिथं एक स्कूटी दिसली. आजूबाजूला कोणीचं दिसत नसल्याने कामगाराने स्कुटी मालकाचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी त्याला पुढच्या बाजूला दोन्ही मायलेकीचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ ही माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. संबंधित कामगारांनी रेल्वे पोलिसांसोबत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. ज्या परिसरात मायलेखीनी आत्महत्या केली. तिथं अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती काहीतरी पुरावा लागेल असं पोलिसांनी सांगितलं.