शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पंचवटीतील भांडणाची का होतेय चर्चा ?
सिंधुबाई खैरणार आणि तुषार खैरणार हे त्यांच्या पार्किंगमध्ये उभे होते. याचवेळी सारिका सुपेकर या आपल्या पाळीव श्वानाला घेऊन आल्या होत्या. त्यावेळी सिंधुबाई यांनी सुपेकर यांना सल्ला दिला.
नाशिक : सध्या नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा ( Crime News ) दाखल झाल्यानंतर समोर आलेली घटना चर्चेचा विषय ठरत आहे. पंचवटीत ( Nashik News ) राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेला वाद नंतर हाणामारी पर्यन्त पोहचला. आणि त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहचल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हातात श्वान घेऊन घराच्या बाहेर असलेल्या महिलेला शेजारणीने सल्ला दिला. श्वानाला आवारा. त्यावरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतक्या वेळ चालला कि नंतर थेट दोन्ही कुटुंबांचा जोरदार राडाच झाला. त्यामध्ये श्वान हातात असलेल्या महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळीव श्वाणाला आवर म्हटल्याचा राग आल्याने संशयितांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पेठरोडवरील कर्णनगर परिसरात ही घटना घडली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सारिका सुपेकर, सिंधुबाई सुपेकर, सिंधुबाई शेवाळे, नंदा कोरडे, साई कोरडे, मयूर जाधव अशी संशयितांची नावे आहे. यामध्ये प्रतिभा शेलार यांच्या तक्रारीवरुन आई सिंधुबाई आणि भाऊ तुषार खैरणार जखमी आहे.
सिंधुबाई खैरणार आणि तुषार खैरणार हे त्यांच्या पार्किंगमध्ये उभे होते. याचवेळी सारिका सुपेकर या आपल्या पाळीव श्वानाला घेऊन आल्या होत्या. त्यावेळी सिंधुबाई यांनी सुपेकर यांना सल्ला दिला.
कुत्र्याला नीट सांभाळा असे बोलल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे पर्यावसन वाढत गेले आणि तुंबळ हाणामारी झाली आहे. सुपेकर यांनी ओळखीच्या लोकांना बोलावून सिंधुबाईशी वाद घालत आहे.
लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे. मायलेक जखमी झाले असून सिंधुबाई यांच्या कानाला दुखापत झाली आहे. यामध्ये त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने गहाळ झाले आहे.
यामध्ये सिंधुबाई आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरू असून पोलीस तपासात आणखी काय समोर येतं ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.