Buldhana Woman Drowned : मुलीला वाचवण्यासाठी आईने विहिरीत उडी घेतली, त्यानंतर जे झालं ते दुर्दैवीच !

खामगाव येथील कोटी गावातील बेबीताई खताळ सकाळी आपल्या 8 वर्षाच्या मुलीसोबत शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली.

Buldhana Woman Drowned : मुलीला वाचवण्यासाठी आईने विहिरीत उडी घेतली, त्यानंतर जे झालं ते दुर्दैवीच !
मुलीला वाचवायला गेलेल्या आईचा बुडून मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 3:48 PM

बुलढाणा : विहिरीतून पाणी काढताना मुलीचा तोल जाऊन मुलगी पाण्यात पडली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता आईने मुलीला वाचवण्यासाठी उडी घेतली. मात्र दुर्दैवाने यात आईचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुलढाण्यात उघडकीस आली आहे. सुदैवाने मुलगी वाचली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोंटी येथे घडली आहे. बेबीताई उमा खताळ असे बुडून मृत्यू झालेल्या 40 वर्षीय आईचे नाव आहे. याप्रकरणी खामगाव पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीतून पाणी काढताना मुलीचा तोल गेला

खामगाव येथील कोटी गावातील बेबीताई खताळ सकाळी आपल्या 14 वर्षाच्या मुलीसोबत शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली.

मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली

यावेळी बेबीताई यांनी मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांना यश येत नव्हते. मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कोणताही विचार न करता क्षणार्धात आईने विहिरीत उडी घेतली.

हे सुद्धा वाचा

बुडून आईचा दुर्दैवी मृत्यू

पाणी खोल असल्यामुळे उडी घेताच त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. तळाशी अडकल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलीने कडा पकडून ठेवल्याने तिचा जीव वाचला आहे.

पीडित कुटुंब हे शेती आणि मेंढी पालनाचा व्यवसाय करते. शेताच्या जवळच झोपडी बांधून राहतात. काल सकाळी बेबीताई या आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलीला घेऊन शेतावर फेरफटका मारायला गेल्या. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.