घरात लगीनघाई सुरु झाली, लग्न 10 दिवसांवर येऊन ठेपले; मात्र मुलीच्या पाठवणीआधीच आईने जे केले ते पाहून सर्वच चक्रावले
सदर महिलेच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. महिलेला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. महिलेच्या मोठ्या मुलीचा 14 डिसेंबर रोजी विवाह होणार आहे.
हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौर कोतवाली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकरणाबाबत ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. घरामध्ये मुलीच्या लग्नाची तयारी सुरु होती. लग्न अगदी 10 दिवसांवर येऊन ठेपले होते. सर्वजण मुलीच्या लग्नाच्या उत्साहात असतानाच घरी हैराण करणारी घटना उघडकीस आली. वधूची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे कळताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. इतकेच नाही तर मुलीच्या लग्नासाठी बनवलेले सर्व दागिने आणि पैसेही आईने सोबत नेले.
घटना उघड होताच नातेवाईकांनी स्थानिक पोलिसात धाव घेतली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दोघांचाही पोलीस शोध घेत असून, लवकरच त्यांना पकडण्यात यईल असे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
सदर महिलेच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. महिलेला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. महिलेच्या मोठ्या मुलीचा 14 डिसेंबर रोजी विवाह होणार आहे. यामुळे घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाचे दागिनेही सर्व खरेदी करण्यात आले आहेत.
नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रणही देण्यात आले. काही नातेवाईक लग्नासाठी घरी दाखलही झालेत. घरी सर्व उत्साहाचे वातावरण असताना शनिवारी रात्री महिला अचानक घरातून गायब झाली.
घरातील दागिने आणि पैसेही गायब
नातेवाईकांना संशय आल्याने महिलेच्या प्रियकराबाबत माहिती घेतली असता तो ही घरातून गायब असल्याचे कळले. नातेवाईकांनी घरातील वस्तू तपासल्या असता दागिने आणि पैसेही गायब असल्याचे दिसले.
यानंतर नातेवाईकांनी रविवारी पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार पोलिसांकडे कथन केला. यानंतर पोलिसांनी दोघांचाही शोध सुरु केला आहे. लवकरच दोघांना पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
महिला आणि तिचा प्रियकर एका फॅक्टरीत एकत्र काम करायचे. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.