धक्कादायक ! 9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन आईनेही आयुष्य संपवलं

आपल्या अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वत:चं आयुष्यही संपवलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

धक्कादायक ! 9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन आईनेही आयुष्य संपवलं
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 11:26 AM

आपल्या अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वत:चं आयुष्यही संपवलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पल्लवी पारोधे (27) असं मृत महिलेचं नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या तर तिच्या अवघ्या या 9 महिन्यांच्या मुलाला तिने आत्महत्येपूर्वी विष दिल्याचे झाले निष्पन्न झाले. त्या मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याच्या डोक्यावरून आईटे छत्र मात्र कायमचे हरपले असून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करून मृत पल्लवीचा मृतदेव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठवला. मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरची लोकं पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याचा करत तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शेगाव पोलिसांनी हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत मयत पल्लवी हिचा पती व दिराला अटक केली आहे. पुढीत तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव येथील नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी  पल्लवी हिच्यासोबत लग्न झाले. त्यांना ९ महिन्याचा मुलगा आहे. आज पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळला तर त्याची आई, पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.  या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पल्लवी हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला .

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.