सून घरी काम करत नव्हती, सासूला संताप अनावर झाला अन् घडू नये ते घडलं !

सून श्रीमंत घरची असल्याने सासरी काम करत नव्हती. तसेच सासूही वारंवार तिच्याकडे हुंड्याची मागणी करायची. यातून पुढे जे घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

सून घरी काम करत नव्हती, सासूला संताप अनावर झाला अन् घडू नये ते घडलं !
कौटुंबिक वादातून सासूने सुनेला संपवले
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 5:32 PM

अमरोहा : उत्तर प्रदेशात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सून घरी काम करत नसल्याने आणि हुंड्यासाठी सासूने सूनेची गोळी घालून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि सासरा तिघांविरोधात हत्या आणि हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिनही आरोपींना अटक केली आहे. कोमल असे मयत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी सुरवातीला आरोपी कुटुंबीयांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

मयत कोमलच्या माहेरची परिस्थिती श्रीमंत होती. यामुळे ती सासरी घरकाम करत नव्हती. तसेच सासू नेहमी तिच्याकडे हुंड्याची मागणी करायची. यामुळे सासू-सुनेमध्ये नेहमी भांडण व्हायचे. याच भांडणातून सासूने सुनेच्या डोक्यात गोळी घालून तिची हत्या केली. यानंतर चलाखीने बंदुक नाल्यात फेकली. घरी चोरीच्या दरम्यान ही हत्या झाल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले.

विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विवाहितेला रुग्णालयात नेले. मात्र तिचा मृत्यू झाला होता. कोमलच्या आईने तिच्या सासूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी केली असता ही सत्य समोर आले. तसेच परिसरातील दुकानदारांनी कोमलच्या सासूला नाल्यात काहीतरी फेकताना पाहिले होते. त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी कोमलच्या सासूला ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली असता तिने सर्व हकीकत सांगितली.

हे सुद्धा वाचा

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.