माता न तू वैरिणी, अनैतिक संबंध आणि जादूटोण्यासाठी निर्दयी मातेने स्वतःच्याच मुलांना…

घराजवळ मैदानात खेळत असलेली दोन मुले अचानक गायब झाली. मुलांची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. मुले सापडत नसल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांच्या तपासात जे उघड झाले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

माता न तू वैरिणी, अनैतिक संबंध आणि जादूटोण्यासाठी निर्दयी मातेने स्वतःच्याच मुलांना...
अनैतिक संबंधाच्या वादातून पुतण्याने काकीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 4:30 PM

मेरठ : उत्तर प्रदेशामध्ये अनैतिक संबंधातून तसेच जादूटोण्याच्या प्रकारातून क्रूर कृत्य करण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतीच एका निर्दयी मातेने केलेल्या क्रूर कृत्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आपल्या अनैतिक संबंधाचा उलगडा होऊ नये म्हणून महिलेने प्रियकराच्या साथीने चक्क आपल्या पोटच्या लेकरांना संपवल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधाबरोबरच तंत्र-मंत्राच्या प्रभावातून तिने हे कृत्य केले. दोन्ही लहान मुलांची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह एका पेटीत भरून सलावा येथील गंग नाल्यामध्ये फेकून देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक केली असून गुन्ह्याचा सखोल तपास केला जात आहे.

मैदानात खेळत असताना मुले अचानक गायब झाली

पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठच्या दिल्ली गेट क्षेत्रातील खैरनगर परिसरातून दोन लहान मुले बेपत्ता झाली होती. दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी या दोघांच्या बेपत्ता होण्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. दोघे घरासमोरील मैदानात खेळत होते, त्याचदरम्यान अचानक बेपत्ता झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये गोंधळ उडाला. घाबरलेल्या रहिवाशांनी आसपासच्या परिसरात शोध घेतला. मात्र मुलांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

संपूर्ण दिवसभर परिसरात हायहोल्टेज ड्रामा सुरू राहिला. यादरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असता संशयाची सुई मुलांच्या आईकडेच वळली होती. मुलांची आई निशा हिचे परिसरातील माजी नगरसेवक सऊद फैजी याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुले बेपत्ता होण्यामागेही त्यांच्याच आईचा अर्थात निशाचा हात असल्याचे उघड झाले. निशाने अनैतिक संबंधातून तसेच तंत्रमंत्राच्या प्रभावातून दोन्ही मुलांना संपवण्याचा कट रचला होता.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीही निशाच्या तीन मुलांचा गूढ मृत्यू

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निशा ही तांत्रिक म्हणून काम करते. परिसरात तिचा प्रचंड दबदबा आहे. यापूर्वी देखील तिच्या तीन मुलांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. याचा धागा पकडत पोलिसांनी निशावर संशय घेतला आणि तिची अधिक चौकशी सुरू केली. पोलिसांनी गंग नाल्यामध्ये दोन्ही मुलांचा शोध घेतला असता मुलाचा मृतदेह सापडला, मुलीचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी अद्याप नाल्यामध्ये शोधसत्र सुरू ठेवण्यात आले आहे.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.