माता न तू वैरिणी ! दोघांनाही लग्न करुन एकत्र रहायचे होते, पण नंतर जे घडले त्याने थेट तुरुंगातच एकत्र गेले !

मफूजा पियादा ही पती अली पियादासोबत गेल्या 15 वर्षांपासून कोलकाता येथे राहत होती. मोलमजुरी करुन दोघेही पती-पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. याचदरम्यान तिची अबुल हुसैन शेख याच्या ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.

माता न तू वैरिणी ! दोघांनाही लग्न करुन एकत्र रहायचे होते, पण नंतर जे घडले त्याने थेट तुरुंगातच एकत्र गेले !
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 3:20 PM

दक्षिण 24 परगणा : प्रियकरासोबत लग्न करण्यास अडथळा ठरणाऱ्या 4 वर्षाच्या मुलाला आईनेच प्रियकरासोबत संपवल्याची संतापजनक घटना पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आली आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात ही क्रूर घटना घडली. याप्रकरणी आरोपी मातेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर तिचा प्रियकर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मफूजा पियादा असे क्रूर मातेचे नाव आहे, अबुल हुसैन असे महिलेच्या प्रियकराचे नाव आहे. स्थानिक नागरिकांमुळे ही हत्येची घटना उघडकीस आली. पोलिसांनी बालकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

महिलेला प्रियकरासोबत लग्न करायचे होते

मफूजा पियादा ही पती अली पियादासोबत गेल्या 15 वर्षांपासून कोलकाता येथे राहत होती. मोलमजुरी करुन दोघेही पती-पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. याचदरम्यान तिची अबुल हुसैन शेख याच्या ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. यानंतर मफूजाचा पती घरी नसताना अबुल तिला भेटायला तिच्या घरी येत असे. मंगळवारी नेहमीप्रमाणे पती कामावर गेल्यानंतर अबुल मफूजाच्या घरी आला. दोघांनी लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

प्रेमसंबंधात मुलगा अडथळा ठरत होता

मात्र मफूजाला 4 वर्षाचा मुलगा होता आणि मुलगा आईशिवाय राहू शकत नव्हता. त्यामुळे दोघांच्या लग्नात मुलगा अडथळा ठरत होता. यामुळे महिलेने प्रियकरासोबत मिळून मुलाला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार मंगळवारी प्रियकर घरी आल्यानंतर दोघांनी मिळून मुलाची हत्या करुन मृतदेह परिसरात फेकून दिला.

स्थानिकांना मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर घटना उघडकीस

मंगळवारी सायंकाळी स्थानिक लोकांना मुलाचा मृतदेह आढळला. मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. यानंतर लोकांनी महिलेकडे मुलाबाबत विचारणा केली असता, तिने काही उत्तर दिले नाही. लोकांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर तिने आपणच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

नागरिकांनी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत निर्दयी मातेला अटक केली आहे. महिलेचा प्रियकर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.