मुलगाही तसाच आणि सूनही तशीच निघाली… आईनेच दोघांना ढगात पाठवलं, 10 महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न; काय पाहिलं असं?

Murder case : आगरा येथील अछनेरा परिसातील एका नवीन विवाह झालेल्या जोडप्याच्या हत्येने पोलिसांची झोप उडवली. पोलिसांनी शिताफीने या खून प्रकरणाचा उलगडा केला, तेव्हा त्यांना धक्का बसला. ही हत्या आईनेच घडवून आणल्याचे समोर आले. प्रकरणात पोलिसांनी आरोपी आईला तिच्या भावासह अटक केली आहे.

मुलगाही तसाच आणि सूनही तशीच निघाली... आईनेच दोघांना ढगात पाठवलं, 10 महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न; काय पाहिलं असं?
खूनाचा असा झाला उलगडा
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 5:56 PM

उत्तर प्रदेशातील अछनेरा परिसरात राहणाऱ्या विकास आणि त्याची पत्नी दीक्षा या जोडप्याची हत्या राजस्थानमधील करोली येथे करण्यात आली. करोली पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी या मृतकांचे मोबाईल जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला. तेव्हा त्यांना धक्का बसला. या हत्येसाठी वापलेले पिस्तूल हे मुलाच्या मामाचे असल्याचे समोर आले. त्यानंतर खूनाची सूत्रधार मुलाची आईच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आई, मामा, चालक यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

करोलीचे पोलीस अधिक्षक बृजेंद्र ज्योति उपाध्याय यांच्यानुसार, मासलपूर ठाण्यातंर्गत भोजपूर गावाजवळ कारमध्ये 30 ऑक्टोबर रोजी सकाळी विकास सिसोदिया आणि त्याची पत्नी दीक्षा या दोघांची कारमध्ये गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आले. हे दोघेही अछनेरा गावचे रहिवाशी असल्याचे तपासाता निष्पन्न झाले. या दोघांचे दहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघे सुद्धा करोली येथील देवीच्या दर्शनासाठी विकासचे मामा रामबरन यांची कार घेऊन गेले होते.

हे सुद्धा वाचा

कारमध्ये गोळ्या घालून हत्या

या मंगळवारी विकास हा पत्नीसह दुपारी करोलीसाठी निघाला होता. प्रकरणात करोली पोलिसांनी 100 हून जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. कारमध्ये विकासचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर तर त्याच्या पत्नीचेा मृतदेह मागच्या सीटवर मिळाला होता. कारमध्ये 7.65 बोरचे आवरण, एक .315 बोरचे आवरण आणि कारच्या बाहेर 7.65 बोरचे काडतूस मिळाले होते.

चमन खान पोपटा सारखा बोलला

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या पती-पत्नी सोबत अजून एक तरुण पोलिसांनी हेरला. त्याचे नाव चमन खान असल्याचे समोर आले. नातेवाईकांच्या माहितीनुसार, चमन हा विकास याला चार-पाच दिवसांपासून कार चालवणे शिकवत होता. तो त्याच्याकडेच राहत होता. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच, विकासाचा मामा रामबरन याच्यासह त्याने ही हत्या केल्याचे त्याने सांगितले.

मुलगा तर मुलगा सूनेचे पण अफेअर

पोलिसांनी प्रकरणात सूत्रधार मुलाची आई ललिता असल्याचे उघड केले. तिने स्वतःच्याच सुनेसह मुलाची हत्या का केली याचा खुलासा केला. मुलाचे एका मुलीसोबत अफेअर होतं. त्यामुळं दीक्षा सारखी सुंदर मुलगी सून म्हणून त्यांनी आणली. दहा महिन्यांपूर्वीच धूमधडाक्यात लग्न झाले. पण लग्नानंतर मुलाचं प्रेम प्रकरण थांबलं नाही. तर दुसरीकडे सूनेचे पण बाहेर अफेअर असल्याचे समोर आले. समाजात, गावात या प्रकरणाची चर्चा होण्याअगोदर दोघांना समजून सांगण्यात आलं. पण दोघांनी घरातील कुणाचंच ऐकलं नाही. त्यामुळे दोघांची हत्या केल्याची कबुली आईने दिली.

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....
'राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून...',शिंदे स्पष्ट बोलले
'राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून...',शिंदे स्पष्ट बोलले.
'पोलिसांच्या वाहनातून सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैसे...'- शरद पवार
'पोलिसांच्या वाहनातून सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैसे...'- शरद पवार.
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.