डोळ्यांदेखत त्याने मुलीला संपवलं, मग आईने MOM चित्रपटासारखा घेतला बदला
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे, जी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे एका 44 वर्षीय व्यक्तीने 24 वर्षीय तरुणीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. आरोपी मुलीवर चाकूने वार करत असताना मुलीच्या आईने हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर तिने थेट..
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 2017 साली रिलीज झालेला ‘मॉम’ चित्रपट आपल्यापैकी बहुतांश लोकांनी पाहिला असेल. त्या चित्रपटात एक आई, तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आरोपींचा खात्मा करते. असंच एक प्रकरण कर्नाटकमध्येही समोर आलं आहे. मात्र ही केस त्यापेक्षा अधिक भयानक आहे. बंगुळूरूत एक दुहेरी खुनाचं प्रकरण समोर आलं आहे. तेथे एका आईसमोरच तिच्या पोटच्या मुलीची हत्या करण्यात आली. मात्र हे पाहून संतापलेल्या त्या आईने तिथल्या तिथेच त्या मारेकऱ्याचीही हत्या केली. बंगळुरूतील जयनगरमध्ये ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 44 वर्षीय व्यक्तीने 24 वर्षीय तरुणीची धारदार चाकूने वार करून हत्या केली. त्यानंतर त्या मुलीच्या आईने आरोपीचा दगडाने ठेचून खून केला. पोलिसांच्या सांगण्यानुसार, सुरेश असे आरोपीचे नाव असून त्याने आधी त्या तरूणीवर चाकूने दोन वार केले. हा सर्व प्रकार त्या तरूणीच्या आईच्या डोळ्यांदेखतच घडला. आपल्या मुलीचा जीव गेल्याचे पाहून त्या माऊलीने मागून येऊन आरोपीच्या डोक्यात दगडाने वार केले. तेथून त्या महिलेने पुन्हा तिच्या मुलीला वाचवण्यासाठी धावली. मात्र तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचाही मृत्यू झाला होता.
काय आहे प्रकरण ?
मृत तरूणी आणि आरोपी सुरेश दोघेही गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. प्राथमिक तपासानुसार ती मृत तरुणी आणि सुरेश हे दोघे एका पार्कमध्ये भेटले आणि तेव्हा त्यांच्या भांडण झाले. खरंतर पीडित तरुणी काही काळ सुरेशपासून अंतर राखत होती. सुरेशला मात्र ते आवडलं नाही. बोलण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता उद्यानात बोलावले. मी कोणालातरी भेटण्यासाठी पार्कमध्ये जात आहे असे आईला सांगून ती तरूणी बाहेर पडली. मात्र तिच्या आईला संशय आल्याने तिने तिचा पाठलाग केला.
पार्कमध्ये पोहोचताच तिची मुलगी सुरेशशी बोलत असल्याचे तिला दिसले. अचानक दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर सुरेशने तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे तरुणीने आरडाओरडा सुरू केला. आपल्या मुलीला आरडाओरडा करताना पाहिल्यानंतर तिच्या आईने तिथे धाव घेतली. मात्र त्यानंतरही सुरेश सतत तरुणीवर चाकूने हल्ला करत होता. तेव्हा त्या महिलेने तिच्या मुलीला वाचवण्यासाठी सुरेशच्या डोक्यात दगडाने वार केले. त्यामुळे सुरेशचा मृत्यू झाला.
नंतर ती महिला परत तिच्या मुलीकडे पोहोचली तेव्हा तिचाही मृत्यू झाल्याचे तिला समजले. हे प्रकरण पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी त्या महिलेला अटक केली असून तिची चौकशी करत आहेत. तसेच या हत्याकांडावेळी पार्कमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.