कलकत्ता : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! असं म्हणतात. पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही म्हणाल, माता तू न वैरिणी…! विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलीचे आयुष्य तिच्या आईनेच (woman tried to kill daughter) संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर तिच्या पोलीस प्रियकरासोबत (planning with lover) कट रचून, तिच्या सोळा वर्षांच्या मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी हरिदेवपूर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. कलकत्त्यामधील हरिदेवपूर येथील मोतीलाल गुप्ता रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे तर प्रसून असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.आरोपी पोलीस कर्मचारी वाहतूक पोलीस हवालदार आहे.
अवैध नात्यात मुलगी बनली अडसर, म्हणून प्रियकरासोबत रचला कट
सोनाली यांचे पती कौशिक हे व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांना एक मुलगी आहे. या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीबत सोनालीचे अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. सोनालीच्या मुलीला हा प्रकार कळला. यावरून तिचे अनेकवेळा आईसोबत भांडण झाले होते. यामुळे सोनालीने मुलीला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तरुणीने हरिदेवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोनालीला अटक केली.
त्या मुलीच्या सांगण्यानुसार, तिची आई सोनाली हिचे विवाहबाह्य संबंध आहेत. तिने प्रियकराशी सल्लामसलत करून मुलीच्या हत्येचा कट रचला. ही मुलगी घरात असताना महिलेने आग लावल्याचा आरोप आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून ते परतले. नंतर मुलगी आईविरुद्ध काही पुरावे घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाली.
हत्या आणि कट रचल्याचा आरोप असलेली आई आणि प्रियकराला अटक
याप्रकरणी मुलगी तक्रार दाखल करण्यासाठी मुलगी पोलिस स्थानकात पोहोचली. त्या मुलीने तिची आई ‘बॉयफ्रेंडशी’ मोबाईलवर बोलत असल्याचे पुरावे पोलिसांना दाखवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथून कट आणि हत्येचा कट रचल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपी महिलेला अटक करण्यात आली.
या महिलेचा प्रियकर प्रसून ( वय 40) हा हुगळीच्या चंदननगरचा रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा राज्य पोलीस दलात कर्मचारी आहे. सोनाली ही मुलीसह वेगळी रहात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र विवाहबाह्य संबंधांमुळे आईने मुलीला मारण्याचा कट रचला, अशी तक्रार आहे. पोलिसांनी सोनाली आणि तिच्या प्रियकराचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येचा कट रचल्याचा पुरावाही सापडला असून आता त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू आहे.