मला का मारलं ? हत्येनंतर 4 महिन्यांनी स्वप्नात आला मुलगा अन् आईने कबूल केला गुन्हा ! कारण ऐकून तुम्ही…

एका महिलेने स्वत:ची चूक लपवण्यासाठी तिच्या पोटच्या गोळ्याचाच बळी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने मागचा पुढचा काहीच विचार न करता अवघ्या तीन वर्षांच्या मुलाला गच्चीवरून...

मला का मारलं ? हत्येनंतर 4 महिन्यांनी स्वप्नात आला मुलगा अन् आईने कबूल केला गुन्हा ! कारण ऐकून तुम्ही...
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 4:23 PM

ग्वाल्हेर | 5 सप्टेंबर 2023  : आई-मुलांचं नातं , प्रेम हे अतिशय वेगळं आणि पवित्र असतं. मुलं कितीही मोठी झाली तरी आईला ती लहानच वाटतात आणि तिचं त्यांच्यावरचं प्रेम कमी न होता आणखनीच दृढ होतं. मात्र मध्य प्रदेशमध्ये आई या शब्दावरचा विश्वासच उडून जाईल अशी एक खळबळजनक घटना घडली आहे. तिथे एक कलयुगी मातेने स्वत:ची चूक लपवण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचाच बळी (mother killed son) दिल्याचे समोर आला आहे. तिने स्वत:च्या मुलाला छतावरून धक्का देत त्याचा जीव घेतला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे (crime news) समोर आले आहे. तिने असं का केलं ते वाचून तर तुम्ही हैराणच व्हाल ! तिला आई तरी कसे म्हणावे असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

आरोपी महिला तिच्या शेजारच्या इसमासोबत प्रेमप्रकरणात गुंतलेली असताना तिचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा तिथे आला . ते पाहून ती घाबरली. आपला मुलगा पतीला हे सर्व सांगेल अशी भीती तिला वाटली आणि तिने मागचा-पुढचा काहीच विचार न करता स्वत:च्याच मुलाला इमारतीच्या छतावरून खाली फेकले.

नक्की काय झालं ?

मिळालेल्या माहिनीतुसार, शहरात हेड कॉन्स्टेबल प्लास्टिकच्या दुकानाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी शेजाऱ्यांनाही बोलावले होते. हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी सर्वांची नजर चुकवून टेरेसवर गेले आणि एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. मात्र तेवढ्यात त्या महिलेचा तीन वर्षांचा मुलगाही गच्चीवर पोहोचले. जेव्हा महिलेने तिच्या मुलाला तिथे पाहिले, तेव्हा ती घाबरली आणि पकडले जाऊ नये, पुरावा मिटवण्यासाठी तिने मुलाला गच्चीवरून खाली ढकलून दिले.

छतावरून पडल्याने त्या निष्पाप बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्यावर एक दिवस उपचारही केले पण त्याला वाचवता आले नाही. छतावरून पडल्याने, अपघातात त्या निरागस मुलाचा मृत्यू झाल्याचे सर्व कुटुबियांना वाटले. 28 एप्रिल रोजी घडली तर 29 एप्रिल रोजी मुलाचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती.

महिलेच्या स्वप्नात आला मुलगा

या घटनेला सुमारे चार महिने उलटून गेल्यानंतर त्या महिलेला वाईट स्वप्न पडू लागलं. तिला स्वप्नात तिचा मुलगा दिसत होता. अनेक दिवस हे सुरू होतं. अखेर त्या महिलेने तिच्या पतीसमोर तिचा गुन्हा कबूल केला. पतीने तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं, व्हिडीओही रेकॉर्ड केला आणि तिला पोलिसांत नेऊन आत्मसमर्पण करायला लावलं. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.