ठाणे | 4 सप्टेंबर 2023 : मुंब्रा-बायपास रोडवर एका धावत्या कारला आग (car caught fire) लागल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. मात्र सुदैवाने त्यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. कारमधील सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी रात्रीच्या सुमारास कुटुंबातील काही मंडळी पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने कारमधून निघाली होती. मात्र मुंब्रा-बायपास रोडवर कार आल्यावर अचानक कारने पेट घेतला. त्यावेळी कारमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि तीन लहान मुले यांचा समावेश होता. मात्र ते सर्वजण सुखरूपरित्या कारमधून बाहेर आले.
Maharashtra | A moving car went up in flames on Mumbra bypass road, Thane. All the seven people present in the car evacuated safely: Thane Municipal Corporation
(Pic Source: Thane Municipal Corporation) pic.twitter.com/sjM2CtASXU
— ANI (@ANI) September 4, 2023
आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर बऱ्याच काळाने कारला लागलेली आग विझवण्यात यश मिळाले. मात्र ही आग नेमकी का, कशी लागली, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे.)