Yogesh Sohoni | ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेता योगेश सोहोनीची एक्स्प्रेस वेवर लूट

अपघात झाल्याचं भासवून स्कॉर्पिओ चालकाने योगेशला सोमाटणे फाट्याजवळ एका एटीएममधून जबरदस्ती 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडलं. (Actor Yogesh Sohoni robbed )

Yogesh Sohoni | 'मुलगी झाली हो' फेम अभिनेता योगेश सोहोनीची एक्स्प्रेस वेवर लूट
Actor Yogesh Sohoni
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:58 AM

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेतील कलाकाराची मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लूट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालिकेत शौनक जहागीरदारची भूमिका साकारणारा युवा अभिनेता योगेश सोहोनी (Yogesh Sohoni) याला स्कॉर्पिओ कार चालकाने लुटल्याचा आरोप आहे. योगेशने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे भागातील शिरगाव पोलिसात तक्रार नोंदवल्याची माहिती आहे. (Mulgi Zali Ho Serial Fame Marathi TV Actor Yogesh Sohoni robbed by Scorpio Car Driver on Mumbai Pune Express Way)

नेमकं काय घडलं?

32 वर्षीय योगेश सोहोनी मुंबईतील अंधेरी भागात राहतो. तो शनिवारी सकाळी आपल्या कारने मुंबईहून पुण्याला निघाला होता. सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास उर्से टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमाटणे एक्झिटजवळ पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ मागून आली. स्कॉर्पिओ चालकाने योगेशला हात दाखवून थांबण्यास सांगितले. त्यामुळे त्याच्या ड्रायव्हरने कार थांबवली.

स्कॉर्पिओ चालकाची दमदाटी

‘तुझ्या कारमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यात एक जण जखमी झाला आहे. अपघाताची तक्रार पोलिसात द्यायची नसेल, तर तू मला सव्वा लाख रुपये दे, नाही तर मी तुझ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करेन’ असं स्कॉर्पिओ चालकाने योगेश सोहनीला धमकावलं. टाईम्स ऑफ इंडिया वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अपघात झाल्याचा बनावच

स्कॉर्पिओ चालकाने योगेशला सोमाटणे फाट्याजवळ एका एटीएममधून जबरदस्ती 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडलं. ती रक्कम घेऊन स्कॉर्पिओ चालक पसार झाला. योगेशला संशय आल्याने त्याने चौकशी केली, तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कोणताही अपघात झाला नसल्याचं त्याला समजलं.

योगेश सोहनीने सोमवारी पोलिसात जबरी चोरी आणि लुटमारीची तक्रार दाखल केली आहे. एक्सप्रेस वेवर असलेल्या सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

(Actor Yogesh Sohoni robbed )
View this post on Instagram

A post shared by Yogesh Sohoni | Actor (@yogeshsohoni)

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर मालिकांच्या चित्रिकरणावर गदा आली. त्यानंतर बहुतांश मालिकांचं चित्रिकरण राज्याबाहेर हलवण्यात आलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं शूटिंग आधी साताऱ्यात केलं जात असे. त्यानंतर कलाकार आणि तंत्रज्ञ गुजरातमध्ये शूटिंग करत होते. गेल्या काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे नवे एपिसोड प्रक्षेपित झालेले नाहीत.

संबंधित बातम्या :

मालिकेच्या शूटिंगनिमित्त गुजरातवारी, मराठी अभिनेत्याला कोरोना संसर्ग

खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो, अभिनेता किरण मानेंच्या जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास!

(Mulgi Zali Ho Serial Fame Marathi TV Actor Yogesh Sohoni robbed by Scorpio Car Driver on Mumbai Pune Express Way)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.