मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

मृत डॉक्टरचं नाव डॉ. तुपे असल्याची माहिती आहे. ते नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाचे विद्यार्थी होते.

मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:11 PM

मुंबई : मुंबईत एका 26 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली आहे. नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली (26 Year Old Doctor Allegedly Died By Suicide). आग्रिपाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या डॉक्टरने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही (26 Year Old Doctor Allegedly Died By Suicide).

मृत डॉक्टरचं नाव डॉ. तुपे असल्याची माहिती आहे. ते नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाचे विद्यार्थी होते. काल रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

हा तरुण डॉक्टर नायर रुग्णालयात एनस्थेशिया म्हणजेच भूल देणारा डॉक्टर होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर डॉ. तुपे नायर रुग्णालयात परतले. काल दिवसभर त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केलं.

रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी काही औषधी घेतल्या. त्या औषधांचा ओव्हर डोज झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तो ज्या खोलीत झोपतो, ती खोली सकाळी बऱ्याच वेळेपर्यंत बंद होता. खोलीचं दार ठोठावूनही आतून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे काही जणांनी मिळून खोलीचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर तुपे हे मृतावस्थेत आढळून आले, अशी माहिती नायर रुग्णालयाचे डीन भारमल यांनी दिली (26 Year Old Doctor Allegedly Died By Suicide).

त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या डॉक्टरने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

26 Year Old Doctor Allegedly Died By Suicide

संबंधित बातम्या :

सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

‘धोनी’ सिनेमातील अभिनेत्याची आत्महत्या, सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक

API भूषण पवार यांची गोळी झाडून घेत आत्महत्या, APMC पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.