Mumbai Airhostess Murder : बळजबरी करण्याचा प्रयत्न फसला, म्हणूनच… एअर होस्टेसच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य उघड

रविवारी रात्री हा गुन्हा घडल्याचे प्रथम उघडकीस आले होते. मृत तरूणीची ख्याली-खुशाली विचारण्यासाठी मैत्रिण घरी आली होती, मात्र बराच वेळ कोणीच दार न उघडल्याने तिने डुप्लीकेटचावीने दार उघडले असता, तरूणी मृतावस्थेत आढळून आली.

Mumbai Airhostess Murder : बळजबरी करण्याचा प्रयत्न फसला, म्हणूनच... एअर होस्टेसच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य उघड
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 9:24 AM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अंधेरीतील पॉश भागातील एका इमारतीत 24 वर्षीय एअर होस्टेसचा मृतदेह (air hostess murder) आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत अवघ्या 24 तासांच्या आतच तिच्या खुन्याला (killer arrested) शोधून काढले. विक्रम अटवाल या ४० वर्षीय आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अंधेरी स्थानिक न्यायालयात हजर केले. पीडितेवर अत्याचार करण्याचा त्याचा हेतू होता, मात्र तिने त्याला कडाडून विरोध केल्याने त्याचा प्रयत्न फसला. त्यामुळेच त्याने तिचा खून केला, अश कबुली आरोपीने दिली. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी वसुनावली आहे.

रविवारी रात्री 11 वाजता हा गुन्हा बाब प्रथम उघडकीस आली. पीडित तरूणी, रुपल ओगरे बराच वेळ दार उघडत नसल्याने तिच्या मैत्रिणीने डुप्लीकेट किल्लीने घराचं दार उघडून शोध घेतला असता रुपल ही बाथरूमजवळ मृतावस्थेत आढळून आली. तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मारेकऱ्याचा शोध घेण्यासही सुरूवात केली. याप्रकरणी त्यांनी 45 जणांची चौकशी केली. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आता त्यांनी मारेकरी, विक्रम अटवाल याला अटक केली. तो मूळचा चांदिवलीच्या तुंगा गावचा रहिवासी आहे. ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे तो सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. घरोघरी साफसफाईचा व्यवसाय पाहणाऱ्या एजन्सीसाठी काम करणाऱ्या अटवालने गुन्हा केल्याची कबुली दिली. मात्र त्याला अटक करतानाच, पोलिसांना त्याच्या घरातून रक्ताचे डाग पडलेले कपडेही सापडले.

भांडणानंतर केली रुपलची हत्या

पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेऊन त्याची तासन् तास कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या दोन दिवस आधीच, शुक्रवारी त्याचा पीडित तरूणी रुपल ओगरे हिच्याशी वाद झाला होता. त्याने सफाईचे काम नीट न केल्याने रुप त्याच्यावर ओरडली होती. यामुळे विक्रम भयानक चिडला. तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने रविवारी तो तिच्या घरी गेला होता. तिला घाबरवण्यासाठी त्याने खिशात धारदार चाकूही ठेवला होता. रुपलच्या घरात घुसल्यावर त्याने तिला जमिनीवर ढकलले, मात्र तिने बचावार्थ जोरदार प्रयत्न केले. त्याला ढकलले, लाथाही मारल्या, त्यामुळे आरोपीचा बळजबरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आरोपीच्या शरीरावर नखांचे असंख्य ओरखडे आहेत. त्याच्यापासून वाचण्यासाठी रुपलने घराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तो घाबरला आणि त्याने तिचं तोंड बंद करण्यासाठी चाकूने गळा चिरून तिची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचे घर आणि गुन्ह्याच्या ठिकाणाची तपासणी करूनही हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांना सापडलेले नाही.

लैंगिक अत्याचाराच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत  

दरम्यान, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल राजावाडी रुग्णालयाने जाहीर केल्याची पुष्टी मंगळवारी पोलिसांनी केली. पीडितेच्या शरीरावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्काराच्या कोणत्याही खुणा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. छत्तीसगड येथील मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.