बॉलिवूड फोटोग्राफरकडून बलात्कार, आठ जणांकडून विनयभंग, 28 वर्षीय मॉडेलच्या आरोपांनी खळबळ

'मीटू' चळवळी अंतर्गत याआधीच आरोप केलेल्या संबंधित 28 वर्षीय मॉडेलने बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली. (Mumbai Model rape bollywood photographer)

बॉलिवूड फोटोग्राफरकडून बलात्कार, आठ जणांकडून विनयभंग, 28 वर्षीय मॉडेलच्या आरोपांनी खळबळ
बॉलिवूड फोटोग्राफरवर बलात्काराचे आरोप
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 3:52 PM

मुंबई : बॉलिवूड फोटोग्राफरवर मुंबईतील मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. अंधेरीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. फोटोग्राफरसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रख्यात चित्रपट निर्मात्याचा मुलगा, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर आणि एका निर्मात्याचाही समावेश आहे. (Mumbai based Model files rape molestation case against bollywood photographer and 8 others)

लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप?

‘मीटू’ चळवळी अंतर्गत याआधीच आरोप केलेल्या संबंधित 28 वर्षीय मॉडेलने बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली. 12 एप्रिल रोजी तक्रारदार तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून खळबळ उडवली होती. एका कामाच्या निमित्ताने शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा दावा तिने केला होता. त्यानंतर फोटोग्राफरने आपल्यावरील आरोप सूडबुद्धीचे असल्याचे सांगत सोशल मीडियावरुनच खोडून काढले होते.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला पत्र

लैंगिक आणि शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी फोटोग्राफरवर केस दाखल करण्याबाबत तिने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला पत्रही लिहिलं होतं. फोटोग्राफरने 2014 आणि 2018 मध्ये खोटी आश्वासनं देऊन वांद्रे परिसरात बलात्कार केला, असा आरोप मॉडेलने तक्रारीत केला आहे. वांद्रे पोलिसांनी 26 मे रोजी एफआयआर दाखल केला.

कोण आहे फोटोग्राफर?

संबंधित फोटोग्राफरने बॉलिवूडमधील अनेक नामवंत सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. त्याने अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससाठीही फोटोग्राफी केली आहे. अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी तो प्रसिद्ध आहे. (Mumbai Model rape bollywood photographer)

फोटोग्राफर नासिर खानचे सेक्स रॅकेट

दरम्यान, नासिर खान याने करण ठाकूर हे खोटं नाव घेऊन सेक्स रॅकेट सुरु केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. खरं तर नासिर बॉलिवूडमध्ये फोटोग्राफर होता. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने ऑनलाईन पद्धतीने आपली एक टोळीच तयार केली होती.

काय होती मोडस ऑपरेंडी?

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना बाहेर जाता येत नाही. अत्यावश्यक असेल तर शासनाची किंवा पोलिस खात्याची परवानगी घेऊन बाहेर जावे लागते. म्हणून आरोपीने अनोख्या पद्धतीने ऑनलाईन सेक्स करण्याचा धंदा सुरु केला. ज्यामध्ये कस्टमर आणि मुलगी हे दोघेही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांसी संपर्क साधत “परफॉर्म” करत असल्याची माहिती समोर आली आहे .

संबंधित बातम्या :

बॉलिवूड फोटोग्राफरच्या ‘ऑनलाईन सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 11 तरुणींची सुटका

(Mumbai based Model files rape molestation case against bollywood photographer and 8 others)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.