पती आहे की हैवान ? पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा, स्क्रू ड्रायव्हरनेही वार; कारण ऐकाल तर…

घरी पत्नीने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. कुर्ला येथे घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या पत्नीवर चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरनेही हल्ला केला.

पती आहे की हैवान ? पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा, स्क्रू ड्रायव्हरनेही वार; कारण ऐकाल तर...
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 8:21 AM

घरी पत्नीने वेळेवर नाश्ता बनवला नाही म्हणून पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार मुंबईत घडल्याचे उघडकीस आले आहे. कुर्ला येथे घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या पत्नीवर चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरनेही हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात वाईटरित्या जखमी झालेल्या ३४ वर्षांच्या महिलेला कुर्ल्यातील भा.भा. रुगणालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी पतीविरोधात कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद फय्युम खान (वय 38) असे आरोपीचे नाव असून गुडिया (वय 34)असे जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला गुडिया ही कुर्ला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या गणेश बाग लेन येथे पतीसोबत रहात होती. गुरूवारी गुडिया हिने वेळेवर नाश्ता बनवला नाही, त्यामुळे तिचा पती चिडला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढला आणि संतापाच्या भरात फय्युमने घरातील शिलाई मशीनच्या शेजारी ठेवलेला हातोडा उचलून गुडिया हिच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने घरातील चाकू घेऊन गुडिया हिच्या गळ्यावर तीन वार केले. एवढेच नव्हे तर त्याने घरातील स्क्रू ड्रायव्हरनेबी पत्नीच्या डोक्यावर मारलं. यामुळे गुडिया ही गंभीर जखमी झाली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या गुडिया यांना तात्काळ कुर्ला येथील भा.भा. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी गुडिया खान हिचा जबाब नोंदवला. जबाबात तिने पतीने आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी फय्युम खानविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.