Mumbai Crime : संशयाच्या भुताने केला संसार उद्ध्वस्त ! पतीने पत्नीवर केला थेट…

आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यांच्यात अनेक मतभेद होते आणि सतत वादही व्हायचे. याच रागातून त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Mumbai Crime : संशयाच्या भुताने केला संसार उद्ध्वस्त ! पतीने पत्नीवर केला थेट...
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 9:33 AM

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : संशयाचं भूत एकदा डोक्यावर स्वार झालं की मग काही खरं नाही. याच संशयातून मुंबईत एका इसमाने त्याच्या पत्नीला जीवानिशी (man attempted to kill his wife) मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्राणघातक हल्ल्यातून ती महिला वाचली असली तरी गंभीर जखमी (woman injured) झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास राहत्या घरी हा प्रकार घडला.

सुरेश सोनी (वय ५६) असे आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या पत्नीवर (वय ३६) चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. मात्र बऱ्याच काळापासून त्यांच्यात विविध मुद्यांवरून वाद होत होते, अशी माहिती वर्सोवा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आरोपी सुरेश सोनी याचे पत्नीशी भांडण झाले होते. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. एवढेच नव्हे तर पत्नीने आपल्या जेवणात विष मिसळले, अशा संशयही त्याने घेतला होता. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये काही मुद्यावरून वाद झाला आणि संतापाच्या भरात आरोपी सोनी याने चाकू उचलून पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या पत्नीच्या दोन्ही हाता-पायांवर तसेच छाती आणि कपाळावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्याचे वृत्त कळताच तिला उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिला आता धोक्याबाहेर असून तिची प्रकृती आता सुधारत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

“आम्ही पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून आरोपी सुरेश सोनी याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी सुरेश सोनी याच्यावर आयपीसीच्या कलम 307 ( खुनाचा प्रयत्न), 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी नमूद केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.