शाळाच काय आता घरातही मुली सुरक्षित नाहीत, नराधम पित्याचाच पोटच्या मुलीवर अत्याचार, अखेर पत्नीनेच फोडली अत्याचाराला वाचा..

बदलापूरमधील शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं आहे. या घटनेमुळे राज्यभरात गदारोळ माजलेला असून गेल्या काही दिवसांत मुलींवरील अत्याचाराची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. मात्र शाळाच काय आता मुली, तरूणी त्यांच्या स्वत:च्या घरातही सुरक्षित नसल्याचेही काही घटनांवरून समोर येत आ

शाळाच काय आता घरातही मुली सुरक्षित नाहीत, नराधम पित्याचाच पोटच्या मुलीवर अत्याचार, अखेर पत्नीनेच फोडली अत्याचाराला वाचा..
वृद्ध बापाने मुलाला संपवलं
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 9:58 AM

बदलापूरमधील शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं आहे. या घटनेमुळे राज्यभरात गदारोळ माजलेला असून गेल्या काही दिवसांत मुलींवरील अत्याचाराची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. मात्र शाळाच काय आता मुली, तरूणी त्यांच्या स्वत:च्या घरातही सुरक्षित नसल्याचेही काही घटनांवरून समोर येत आहे. एका नराधम पित्याने त्याच्या पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आगे. मुंबईतील मालाड येथे हा प्रकार घडला असून अखेर त्याच्या पत्नीनेच या अत्याचाराला वाचा फोडत पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घरात कोणी नसल्याची संधी साधली आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघ्या 9 वर्षांची असून ती आई-वडिलांसोबत मालाड येथे राहते. जून महिन्यात ही घटना घडली. घरात कोणी नसताना नराधम पित्याने त्याच्याच नऊ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने अनेकदा स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे ती मुलगी अतिशय भेदरली होती. अखेर तिने हिंमत करून तिच्या आईला सर्व प्रकार सांगितला.

आपल्याच पतीने, पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजताच त्या महिलेचा पायाखालची जमीनच सरकली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. मात्र त्यानंतर तिने या अत्याचाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. अखेर त्या महिलेने सोमवारी रात्री दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीचे सर्व कृत्य पोलिसांसमोर कथन करत आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.